मेष: आज आपले प्रत्येक काम उत्साह व आवेश यांनी पूर्णतः भरलेले असल्याचा अनुभव आपणास येईल. शरीर व मन स्फूर्ती आणी टवटवीतपणाने भरेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आणखी वाचा
वृषभ: आज क्रोध व निराशेची भावना मनात पसरेल. प्रकृती साथ देणार नाही. घर - परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील. आपली उग्र वाणी कोणाशी मतभेद किंवा भांडणाचे कारण बनू शकेल. आणखी वाचा
मिथुन: आज विविध मार्गांनी लाभ झाल्यामुळे हर्षोल्हास वाढेल. पत्नी व संतती कडून फायदेशीर बातमी मिळेल. मित्रांशी संवाद साधल्याने आनंद मिळेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. सुग्रास भोजनाचा आस्वाद घेता येईल. आणखी वाचा
कर्क: आज गृह सजावटीवर आपण विशेष लक्ष द्याल. घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल. व्यापारी व नोकरदार लाभाची किंवा बढतीची अपेक्षा करू शकतात. आणखी वाचा
सिंह: आजचा दिवस आळस व थकवा ह्यात जाईल. आपल्या तापट स्वभावामुळे मानसिक तणाव राहील. पोट दुखीने हैराण व्हाल. यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. आणखी वाचा
कन्या: आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील. आज आपला आवेश व क्रोध वाढणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. आणखी वाचा
तूळ: आज सांसारिक जीवनाचा आनंद खर्या अर्थाने लुटाल. सामाजिक हेतूने कुटुंबीयांसह बाहेर जावे लागेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. व्यापारी वर्गाला व्यापारात वाढ होईल. आणखी वाचा
वृश्चिक: आज अचानक काही घटना घडतील. ठरलेल्या भेटी रद्द झाल्याने निराश व क्रोधीत व्हाल. हाती आलेली संधी सुटून जात असल्याचे दिसेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आणखी वाचा
धनु: आज आपण संततीचा अभ्यास व स्वास्थ्य ह्यामुळे चिंतीत व्हाल. पोटाच्या तक्रारी सतावतील. कामातील अपयशाने आपण निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा
मकर: उत्साह व आनंद यांचा अभाव राहील. स्वजनांशी मतभेद होतील. छाती संबंधी आजार होऊ शकतो. झोप येणार नाही. मानहानी होऊ शकते. एखादा अपघात संभवतो. आणखी वाचा
कुंभ: चिंता नाहीशी होऊन उत्साह वाढेल. घरात भावंडांसह काही आयोजन कराल. त्यांच्यासह वेळ आनंदात जाईल. मित्रांच्या व आप्तांच्या भेटी होतील. जवळच्या ठिकाणी सहलीसाठी जाऊ शकाल. विरोधकांवर मात करू शकाल. आणखी वाचा
मीन: रागावर व वाणीवर सुद्धा ताबा ठेवावा लागेल. आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार सावधपणे करावे लागतील. शारीरिक व मानसिक आरोग्य मध्यम राहील. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मनात नकारात्मक विचार येतील. आणखी वाचा