Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 22 ऑगस्ट 2022: सिंह राशीसाठी पदोन्नतीची शक्यता, तर कन्या राशीसाठी परदेशगमनाचे योग, वाचा तुमचं आजचं राशीभविष्य...

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-08-22 05:53:56 | Updated: August 22, 2022 05:53 IST

Today Daily Horoscope 22 August 2022: कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य...

Open in app

मेष: आज कुटुंबात व कामाच्या ठिकाणी समजूतदारपणाने व्यवहार केल्याने संघर्ष टळतील. वाणीवर नियंत्रण न राहिल्याने कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. स्त्रियांकडून फायदा होईल. आणखी वाचा...

वृषभ: आज खंबीर विचारांमुळे आपण सावधपणे काम कराल. आर्थिक विषयांचे योग्य नियोजन कराल. आपली कलात्मक जाण वाढीस लागेल. वस्त्रे, अलंकार, सौंदर्य प्रसाधने व मनोरंजनावर खर्च होईल. आणखी वाचा...

मिथुन: आज आपली वाणी किंवा व्यवहार इतरांशी गैरसमज निर्माण करू शकतात. कुटुंबीय व सगे - सोयरे यांच्याशी वागताना खूप सांभाळून राहावे लागेल. आजार किंवा दुर्घटना होण्यामुळे ते संबंध सांभाळा. आणखी वाचा...

कर्क: आजचा दिवस आर्थिक नियोजन व नव कार्यारंभ करण्यासाठी उत्तम आहे. उद्योग - व्यवसायात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नाच्या मार्गांत वाढ झाल्याने आपणाला खूप आनंद व समाधान वाटेल. मित्र, पत्नी, संतती अशा सर्वांकडून आनंददायी बातम्या मिळतील. आणखी वाचा...

सिंह: आजचा दिवस नोकरी - व्यवसायात लाभदायी व यशदायी आहे. आपल्या कार्य क्षेत्रात वर्चस्व मिळवाल व प्रभाव पाडाल. पुरेपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल यामुळे आपली कामे सहजपणे पार पडतील. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामाची कदर करतील. पदोन्नतीची शक्यता आहे. आणखी वाचा...

कन्या: आजचा दिवस आपला परोपकारी कार्यात खर्च होईल. एखाद्या प्रवासात संवाद साधण्याची संधी मिळेल. परदेशगमनाचे योग येतील. भावंडांकडून लाभ होईल. आणखी वाचा...

तूळ: आजचा दिवस अचानक धनलाभाचा आहे. एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तरीही नवे कार्य हाती घेऊ नका. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. हितशत्रू आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. आणखी वाचा...

वृश्चिक: आज दैनंदिन घटनाक्रमात बदल होईल. आज आपण मौज- मजा व मनोरंजनाच्या विश्वात फिरण्याच्या मूडमध्ये असाल. मित्र व कुटुंबीयांची त्यात साथ मिळेल. सार्वजनिक जीवनात मान - प्रतिष्ठा वाढेल. नवीन वस्त्र प्रावरणे व वाहन सुख मिळेल. आणखी वाचा...

धनु: आजचा दिवस आर्थिक व व्यापारी नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. कार्ये यशस्वी होतील. आज परोपकाराची भावना प्रबळ होईल. आजचा दिवस आनंदात व्यतित होईल. नोकरी - व्यवसायात उन्नती व मान - सन्मान प्राप्त होईल. आणखी वाचा...

मकर: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज बौद्धिक कामे व व्यवसायात आपण नवी विचार प्रणाली अंमलात आणाल. लेखन व साहित्य क्षेत्रात आपली सृजनात्मकता दिसेल. तरीही मनाच्या एका कोपर्‍यात अस्वस्थता जाणवेल. परिणाम असा होईल की त्यामुळे शारीरिक थकवा व ऊबग येईल. आणखी वाचा...

कुंभ: आज नकारात्मक विचारांनी मन हताश होईल. आज उद्वेग व क्रोध आपल्या मनात जागा घेईल. खर्च वाढेल. बोलण्यावर संयम न राहिल्याने घरात मतभेद व भांडणे होतील. स्वास्थ्य खराब होईल. दुर्घटनेपासून स्वतःला सांभाळा. आणखी वाचा...

मीन: आजचा दिवस सुख शांतीत जाईल. व्यापार्‍यांना भागीदारीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. पति - पत्नी वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. मित्र, स्वजन ह्यांचा सहवास घडेल. प्रणयाराधन वाढेल. आणखी वाचा...

टॅग्स :राशिभविष्य २०२१
Open in App