मेष: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराच्या सजावटीत बदल करण्याचा विचार मनात येईल. कार्यालयीन किंवा व्यापारी क्षेत्रातील अधिकारी वर्गाशी महत्वाची चर्चा होईल. सरकारी फायदा मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
वृषभ: आज नवीन काम करण्याची प्रेरणा मिळून त्याची आपण सुरुवात सुद्धा करु शकाल. एखादया रमणीय स्थळाला भेट देऊन आपले मन प्रसन्न होईल. दूरचे प्रवास संभवतात. दूरवरच्या मित्रांच्या शुभ बातम्या समजतील. परदेशी जाण्याची संधी लाभेल. आणखी वाचा
मिथुन: आजारी व्यक्तींची तपासणी किंवा शस्त्रक्रिया करावी लागेल. मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रकृती बिघडेल. मानसिक दृष्टया निराश व्हाल. मनाला शांतता मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणखी वाचा
कर्क: आज संवेदनशीलता व प्रेमाने व्याप्त होऊन आपले मन भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित होईल. मौल्यवान मौज - मजेच्या वस्तू, वस्त्राभूषणे तथा वाहन इत्यादींची खरेदी होईल. आणखी वाचा
सिंह: आज उदासीनता व साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल. दैनंदिन कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. खूप परिश्रम कराल पण त्यामानाने कमी फळ मिळेल. नोकरीत सांभाळून राहा. सहकारी फारसे सहकार्य करणार नाहीत. आणखी वाचा
कन्या: आज आपणाला संतती समस्येमुळे चिंता राहील. अपचना सारख्या पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. बौद्धिक चर्चा व वाद - विवादात सहभागी होऊ नका. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. प्रणयाराधनेत यशस्वी व्हाल. आणखी वाचा
तूळ: आज आपण खूप भावनाशील व्हाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या प्रकृतीची काळजी राहील. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. कौटुंबिक व जमीन - जुमल्या संबंधी चर्चा करताना दक्ष राहा. आणखी वाचा
वृश्चिक: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. भावंडांशी कौटुंबिक चर्चा व नियोजन होईल. तन - मन स्फूर्ती व चैतन्याने भरून जाईल. मित्र, सगे सोयरे यांचे आपणाकडे येणे झाल्याने आपण आनंदी राहाल. आणखी वाचा
धनु: कुटुंबियांशी गैरसमज निर्माण झाल्यामुळे मतभेद वाढतील. आज मानसिक व्यवहारात खंबीरता नसल्यामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका. महत्वाचा निर्णय घेऊच नका. नाहक खर्च व अकारण व्यवहार मनाला व्यथित करतील. आणखी वाचा
मकर: आजच्या दिवसाची सुरुवात प्रसन्न वातावरणाने होईल. घरात मंगलमय वातावरण राहील. मित्र तसेच सगेसोयरे यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. कामे सहजपणे पूर्ण होतील. नोकरी - व्यवसायात लाभ होईल. प्रकृती उत्तम राहिली तरी सुद्धा कोठे पडणे, जखम होणे यांपासून जपावे लागेल. आणखी वाचा
कुंभ: आज आर्थिक देवाण- घेवाण किंवा जामीनकीत आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. एकाग्रता न झाल्याने मानसिक अस्वास्थ्य वाढेल.प्रकृती विषयी समस्या उदभवतील. आर्थिक गुंतवणूक अयोग्य ठिकाणी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. आणखी वाचा
मीन: आज समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल. सामाजिक कामात भाग घ्यावा लागेल. वडिलधारी व मित्रांचा सहवास लाभेल. मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. संतती व पत्नीकडून लाभ होतील. आणखी वाचा