Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Follow 2024-11-19 07:39:35 | Updated: November 19, 2024 07:39 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष:  आज आपल्या विचारांची अस्थिरता आपणास अडचणीत आणेल. नोकरी - व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील, ज्यातून बाहेर पडण्यात आपण यशस्वी व्हाल. नवी कामे करायला प्रेरीत व्हाल. लहान प्रवासाची शक्यता आहे. बौद्धिक किंवा लेखन कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.  आणखी वाचा 

वृषभ:  आज आपल्या मनाची द्विधा अवस्था आपणास ठाम निर्णय घेऊ देणार नाही. त्यामुळे हाती आलेल्या संधीला मुकावे लागेल. फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे. लेखक, कारागीर, कलावंत ह्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. आणखी वाचा 

मिथुन:  आजचा दिवस लाभदायी आहे. सकाळ पासूनच उत्साह व प्रसन्नता अनुभवाल. मित्र व नातलग यांच्यासह उत्तम भोजनाचा लाभ घ्याल. आर्थिक लाभ होईल व त्याच बरोबर भेटवस्तूही मिळतील. त्यामुळे दिवस खूप खुशीत जाईल.  आणखी वाचा 

कर्क:  आज आपणास खिन्नता व भीतीचा अनुभव येईल. कुटुंबात मतभेद झाल्याने कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल. मन द्विधा झाल्याने आपण बेचैन व्हाल. बोलण्यावर ताबा ठेवा नाहीतर मतभेद होऊ शकतात. स्वास्थ्याकडे लक्ष द्या. आणखी वाचा 

सिंह:  आज आपणास विविध प्रकारे लाभ होऊ शकतात. अशा वेळी थोडे गाफील राहिलात तर लाभा पासून वंचित होऊ शकता, म्हणून तिकडे लक्ष द्यावे. मित्र मंडळ, स्त्रीवर्ग व थोरामोठयांकडून लाभ होतील.  आणखी वाचा 

कन्या:  आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यास किंवा नवीन योजना अंमलात आणण्यास अनुकूल आहे. व्यापारात लाभ होईल. जुने येणे वसूल होईल. नोकरीत पदोन्नती संभवते. पितृघराण्याकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.  आणखी वाचा 

तूळ:  आज आपण दूरचा प्रवास करण्याची शक्यता आहे. परदेशी प्रवासास अनुकूलता राहील. तरी सुद्धा संतती व स्वास्थ्य ह्या संबंधी चिंता लागून राहील. नोकरीत वरिष्ठ किंवा सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळणार नाही.  आणखी वाचा 

वृश्चिक:  आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा लागेल. नवे कार्य सुरू करू नका. क्रोध व अवैध आचरण आपणास अडचणीत टाकू शकतील. वेळेवर भोजन मिळणार नाही.  आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस बौद्धिक, तार्किक, विचार- विनिमय व लेखन कार्य ह्यासाठी अनुकूल आहे. मनोरंजन, प्रवास, मित्रांचा सहवास,, सुंदर भोजन, वस्त्र प्रावरणे, भिन्नलिंगी व्यक्तीशी जवळीक इत्यादींमुळे आजचा दिवस आनंदात जाईल. भागीदारीत फायदा होईल. आणखी वाचा 

मकर:  आज आपले स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती व आनंद प्राप्ती होईल. कुटुंबीयांसह आनंदात दिवस जाईल. व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल. धनलाभ होईल. प्रतिस्पर्ध्याला नामोहरम कराल. सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल.  आणखी वाचा 

कुंभ:  आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. वैचारिक दृष्टया गर्क राहिल्याने कोणताही महत्वाचा निर्णय न घेणे हेच हितावह राहील. प्रवासात त्रास संभवतो. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने खूप निराशा होईल. मन अशांत राहील. पोटदुखी सतावेल.  आणखी वाचा 

मीन:  आज उत्साह व स्फूर्ती यांचा अभाव राहील. आईची तब्येत खराब होऊ शकते. मित्र व नातेवाईक यांच्या बरोबर वाद - विवाद होईल. काही त्रास किंवा विरोधी परिस्थितीमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य खराब होऊ शकेल. कोर्ट - कचेरीची कागदपत्रे सावधानतेने करा, एखाद्या वेळेस मानहानीला ते कारण होईल.  आणखी वाचा 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App