आजचे राशीभविष्य, १८ जून २०२३: आर्थिकदृष्ट्या लाभ, रुचकर भोजनाचा आस्वाद; आनंदाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow 2023-06-18 07:28:20 | Updated: June 18, 2023 07:28 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विचार एकदम बदलतील त्यामुळे महत्त्वपूर्ण कार्यात अंतीम निर्णय घेणे जमणार नसल्याने आज कोणताही निर्णय न घेणे हितावह राहील. कामानिमित्त किंवा काही कारणास्तव प्रवास करावा लागेल. लेखनकार्य करण्यास दिवस अनुकूल आहे. बौद्धिक व तार्किक विचार विनिमय होईल. आणखी वाचा 

वृषभ: आज चंचल मनःस्थितीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल. समजूतदारपणा दाखविल्यास कोणाशी संघर्ष होणार नाही. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. लेखक, कलाकार तथा सल्लागार ह्यांच्यासाठी दिवस अनुकूल आहे. नवे काम आरंभ करण्यात अडचणी येतील. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. स्वादिष्ट व रूचकर भोजनाचा आस्वाद घेऊन, वस्त्रालंकार मिळवून तसेच मित्र व कुटुंबीय यांच्या सहवासामुळे मानसिकदृष्टया दिवस अत्यंत आनंददायी ठरेल. प्रकृती उत्तम राहील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. नकारात्मक विचार मनात येऊ न देणे हितावह राहील. आणखी वाचा 

कर्क: आज मनःस्थिती त्रिशंकू अवस्थेत असल्यामुळे कोणताही महत्वाचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही. संबंधित व्यक्तींशी मतभेद संभवतात. प्रापंचिक कार्यावर खर्च होईल. वाणी वर संयम ठेवावा लागेल. मनातील साशंकता दूर करावी लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानहानी व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

सिंह: आजचा दिवस लाभदायी आहे. मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. रम्य स्थळी प्रवासाला जाल. निर्णय न घेण्याच्या वृत्तीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल म्हणून महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकणे हितावह राहील. विचार करण्यात खूप वेळ जाईल. आर्थिक लाभ संभवतात. आणखी वाचा 

कन्या: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नव्या कार्याचे बेत तडीस जातील. व्यापारी व नोकरदारांसाठी दिवस अनुकूल आहे. व्यापारात फायदा व नोकरीत बढतीची शक्यता आहे. पित्याकडून लाभ संभवतात. घरात आनंदी वातावरण राहील. आणखी वाचा 

तूळ: व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरी व व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरवरच्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. लेखनकार्य व बौद्धिक क्षेत्रात सक्रिय राहाल. परदेशातून मित्र व नातलगांकडून आनंददायी बातमी मिळेल. आणखी वाचा 

वृश्चिक: आजचा दिवस शांततेत व सावधानतेत घालवावा लागेल. नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता असल्याने नवीन कामे सुरू न करणे हितावह राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. सरकार विरोधी प्रवृतींपासून दूर राहणे हितावह राहील. खर्च वाढल्याने आर्थिक संकटाची शक्यता आहे. आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस आनंदात जाईल. मनोरंजनाच्या प्रसंगातून मन आनंदी राहील. व्यक्तीच्या सहवासातून आनंद मिळेल. मित्रांसह एखादा प्रवास, एखादी सहल ठरवाल. लेखन कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. भागीदारीतून फायदा होईल. आणखी वाचा 

मकर: आजचा दिवस व्यापार - व्यवसायास अनुकूल आहे. व्यापार वृद्धी होईल. आर्थिक व्यवहार यशस्वीपणे होतील. घरातील वातावरण आनंदी राहील. योग्य ठिकाणीच पैसा खर्च होईल. नोकरीत सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. व्यापाऱ्यांना कायदेशीर त्रास संभवतो. परदेशाशी व्यापार वाढेल. शत्रूवर मात कराल. आरोग्य उत्तम राहील. आणखी वाचा 

कुंभ: आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. विचारात सतत बदल होत असल्याचे दिसून येईल. महिलांनी बोलण्यावर संयम ठेवावा. प्रवास शक्यतो टाळावेत. संतती विषयी काळजी राहील. लेखन व नवनिर्माण या कामासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बौद्धिक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल. अचानक खर्च उदभवतील. आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस मनाविरुद्ध गोष्टी घडण्याचा आहे. त्यामुळे आपला उत्साह मावळेल. कुटुंबात वाद संभवतात. मन नाराज राहील. स्वास्थ्य बिघडल्याने झोप लागणार नाही. पैसा व कीर्ती यांची हानी संभवते. नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल. स्थावर मालमत्ता, वाहन इत्यादींशी संबंधित दस्तावेजात काळजी घ्यावी. आणखी वाचा 

 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App