Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-12-16 07:06:45 | Updated: December 16, 2025 07:06 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष:  आज आपणाला सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. कौटुंबिक व दांपत्य जीवनात सुख - समाधान मिळेल. मौज - मस्ती व मनोरंजनामुळे सहजीवनात लाभ होईल. जोडीदाराशी सुसंवाद साधू शकाल.  आणखी वाचा 

वृषभ: आज उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवावा लागेल. कोणाची चेष्टा - गंमत करण्याच्या नादात भांडणाची स्थिती उद्भवेल. गैरसमज निर्माण होतील. मौज - मजा, करमणूक यावर खर्च होईल. मानसिक उन्मत्तपणा अधिक समस्या निर्माण करील. त्यावर ताबा ठेवावा लागेल.  आणखी वाचा 

मिथुन: आज संतती व वैवाहिक जोडीदार ह्यांच्या प्रकृतीची काळजी राहील. वाद - विवाद, चर्चा ह्यात खोलात जाऊ नका. आत्मसन्मान दुखावला जाईल. मैत्रिणींमुळे खर्च व नुकसान होण्याची शक्यता आहे. त्रस्त व्हाल. नवीन कार्यारंभ व प्रवास शक्यतो टाळा.  आणखी वाचा 

कर्क: आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. छातीत दुखणे किंवा अन्य विकारामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण राहील. स्त्री वर्गाशी मतभेद वा भांडण होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक जीवनात अपमान झाल्याने दुःख होईल. धन खर्चाची व अपयशाची शक्यता आहे. आणखी वाचा 

सिंह: आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. शेजारी-पाजारी व भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. ठरवलेली कामे पूर्ण होतील. जवळचा प्रवास घडेल. प्रगतीच्या संधी चालून येतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंदित करेल. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा 

कन्या: आज मानसिकता द्विधा राहील. नकारात्मक विचार मनाची बेचैनी वाढवतील. कुटुंबियांशी गैरसमज किंवा मतभेद होतील. नाहक खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. बौद्धिक चर्चा करताना भांडण होणार नाही याची दक्षता घ्यावी. आयात - निर्यातीच्या व्यवसायात यश मिळेल. आणखी वाचा 

तूळ: सांप्रत काळी चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन करू शकाल. आज कलात्मक व सृजनात्मक शक्ती सर्वोत्तम राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. दृढ विचार व आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. भागीदारांचे विचार पटतील. मौज - मस्ती व मनोरंजनावर खर्च कराल. आणखी वाचा 

वृश्चिक:  आज हर्षोल्हास व मनोरंजनावर पैसे खर्च कराल. मानसिक चिंता व शारीरिक तगमग यांमुळे त्रासून जाल. वाणीवर संयम नसल्याने भांडणतंटा होऊ शकतो. कुटुंबीय व स्नेही यांच्याशी पटणार नाही.  आणखी वाचा 

धनु:  आज प्रेमाचा सुखद अनुभव मिळण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिकदृष्टया आजचा दिवस लाभदायक आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. मित्रांकडून लाभ होईल. उत्पन्नाची साधने वाढतील. व्यापारात वाढ होऊन लाभ होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. मंगलकार्ये होतील. उत्तम भोजनाचा आस्वाद मिळेल.  आणखी वाचा 

मकर: आज व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत आपल्या कष्टाचे चीज होईल. घर, कुटुंब व संततीच्या बाबतीत आनंद व समाधानाची भावना राहील. व्यावसायिक कामानिमित्त धावपळ वाढेल. नोकरीत बढती मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होतील.  आणखी वाचा 

कुंभ: आज अस्वास्थ्य जाणवेल. पण मानसिक दृष्टया शांतता जाणवेल. कामात उत्साहाचा अभाव राहील. कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. तसेच प्रतिस्पर्ध्यांशी वाद करणे योग्य ठरणार नाही. मौज - मजेसाठी जास्त खर्च कराल. परदेशगमनाची शक्यता वाढेल. परदेशातून आनंददायी बातम्या मिळतील. संततीची काळजी लागून राहील.  आणखी वाचा 

मीन: आज काही प्रमाणात प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. अधिक खर्च होईल. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल. अचानक धनलाभ होऊन आपल्या मनावरील भार काही अंशी हलका होईल. व्यापार्‍यांची जुनी येणी वसूल होतील.  आणखी वाचा 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Horoscope Today, December 16, 2025: Success in work, sudden gains, happy day

Web Summary : The horoscopes for December 16, 2025, predict varied experiences for each zodiac sign. Leos will have a good day, while Cancer natives may face challenges. Some signs may experience financial gains, while others need to be cautious in their interactions and spending.
टॅग्स :दैनिक राशीभविष्यफलज्योतिषराशी भविष्यअध्यात्मिक
Open in App