आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-10-15 06:53:03 | Updated: October 15, 2025 06:53 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आज आपण खूप संवेदनशील झाल्याने कोणाचे बोलणे आपल्या भावना दुखावेल. स्थावर संपत्ती संबंधी कोणताही निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. मानसिक तळमळ व शारीरिक अस्वास्थ्य राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्वाभिमान दुखावला जाईल. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जपून राहावे लागेल. आणखी वाचा 

वृषभ: आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. कुटुंबियांशी घरातील प्रश्नांसंबंधी चर्चा कराल. मित्रांसह प्रवासाचे नियोजन कराल. आर्थिक गोष्टींकडे अधिक लक्ष दिले तर प्रत्येक कामात यश मिळेल. नशिबाची साथ लाभेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रियजनांचा सहवास व सार्वजनिक सन्मान मिळेल. व्यापारात वाढ होईल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. थकवा, कार्यमग्नता व प्रसन्नता ह्यांचा संमिश्र अनुभव येईल. निर्धारित कामे पूर्ण करू शकाल. धनप्राप्तीची योजना बारगळेल असे आधी वाटले तरीही नंतर त्यात यश मिळेल. मित्र व हितचिंतकांचा सहवास घडेल. व्यवसायात उत्साह व प्रसन्नता वाढेल. सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. आणखी वाचा 

कर्क:  मित्र व स्नेही यांच्यासह आजचा दिवस आपण उल्हासात घालवू शकाल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. भावनाशील व्हाल. आज काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

सिंह: आज आपणास आपल्या संवेदनशीलतेवर संयम ठेवावा लागेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. शक्यतो निरर्थक वाद टाळा. कामे जपून करा. विदेशातून काही बातमी येईल. संयमित राहा. सावधपणे व्यवहार करा. आज खर्चात वाढ होईल. आणखी वाचा 

कन्या: आजचा दिवस आनंदात व उत्साहात जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. त्यात एखाद्या स्त्रीची भूमिका महत्वाची असेल. मित्रासह एखाद्या रम्य- स्थळी जाल. संततीकडून चांगली बातमी मिळेल. आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांसह महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. पदोन्नती संभवते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. फायदा होईल. सरकारी कामात यश मिळेल. आणखी वाचा 

वृश्चिक:  आज शारीरिक थकवा, आळस व मानसिक चिंता अनुभवाल. व्यवसायात अडचणी येतील. संततीशी मतभेद होतील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. अनावश्यक खर्च वाढतील. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. शक्यतो आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नये. राजकीय समस्या उद्भवतील. आणखी वाचा 

धनु:  आज आपण वाणी व संताप यावर आवर घालावा अन्यथा अनर्थ ओढवेल. मानसिक तणाव जाणवेल. धन खर्च वाढेल. निषेधार्ह व अवैध कृत्य वाईट मार्गावर नेईल हे लक्षात ठेवा. आणखी वाचा 

मकर: दैनंदिन काम सोडून आज आपण मनोरंजन व गाठी भेटी ह्यात आपला वेळ घालवाल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मित्रांसह फिरायला जाल. मोठ्या धनलाभाची संभावना आहे. व्यापार वाढेल. भागीदारीतून लाभ होईल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादीतून भरपूर प्राप्ती होईल. मान-सन्मान वाढतील. आणखी वाचा 

कुंभ: आजचा दिवस कार्य सिद्धीच्या दृष्टीने शुभ फलदायी आहे. कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. कुटुंबीयांसह वेळ चांगला जाईल. घरातील वातावरण चांगले राहील. तन-मन उत्साही व आनंदी असेल. भावनात्मक विचारांचा दिवस आहे. नोकरीत सहकार्यांच्या मदतीने कार्य तडीस न्याल. कामानिमित्त पैसा खर्च होईल. आणखी वाचा 

मीन:  आज आपण कल्पना विश्वात विहार करणे पसंत कराल. साहित्य लेखनात आपण सृजनशीलता दाखवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. प्रेमालाप होईल. शेअर बाजारात लाभ होईल. मानसिक समतोल मात्र राखावा लागेल. आणखी वाचा 

 

English
हिंदी सारांश
Web Title : October 15, 2025 Horoscope: Success in government work, money gains.

Web Summary : Mixed day for zodiac signs. Some may face emotional distress, financial gains, or travel opportunities. Focus on maintaining balance and avoiding conflicts for a better day.
टॅग्स :दैनिक राशीभविष्यफलज्योतिषराशी भविष्यअध्यात्मिक
Open in App