मेष: आजचा दिवस आनंदोत्सव साजरा करण्याचा आहे. प्रत्येक काम यशस्वी होईल. घरातील वातावरण आनंदाचे असेल. काही लाभ होऊन चांगली बातमी मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. उन्नती होऊ शकते. गायत्री चालिसाचे पठण करावे. आणखी वाचा
वृषभ: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. विविध चिंता सतावतील. स्नेही व नातलग ह्यांच्याशी मतभेद झाल्याने घरात विरोधी वातावरण निर्माण होईल. कामे अपूर्ण राहतील. काही कारणास्तव खर्च वाढेल. केलेल्या कष्टाचे फळ असमाधानकारक असेल. रविवारी उपवास करून सूर्याची आराधना करावी. आणखी वाचा
मिथुन: आजचा दिवस व्यापारी वर्गासाठी शुभ फलदायी आहे. व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून लाभ होतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे. एखादी चांगली बातमी मिळेल. गायत्री मंत्राचा एक माळ जप करावा. आणखी वाचा
कर्क: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यापारी वर्गास लाभ होईल. नोकरीत बढती संभवते. कुटुंबात एकोपा राहील. नवीन सजावट करून घराची शोभा वृद्धिंगत कराल. आईकडून लाभ होईल. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता लाभेल. धन व प्रसिद्धी वाढेल. आपण काहीतरी नवीन करण्याची योजना सुद्धा आखाल. रोज सूर्यास कुंकू मिश्रित पाण्याचा अर्घ्य द्यावा. आणखी वाचा
सिंह: आजचा दिवस आळस व थकवा ह्यात जाईल. आपल्या तापट स्वभावामुळे मानसिक तणाव राहील. यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. नकारात्मक विचार, वर्तन व नियोजन यापासून दूर राहावे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अनेक मोठ्या अधिकाऱ्यांशी संपर्क होतील. समाजात सन्मानित व्हाल. नवीन मैत्री होईल. सूर्याच्या बारा पवित्र नावांचा जप रोज करावा. आणखी वाचा
कन्या: आज आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. एखादा प्रवास संभवतो. खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी चांगला काळ आहे. काहीजणांना रोजगाराची नवीन संधी सुद्धा मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. शिव पंचाक्षर मंत्राचा जप करून सूर्यास अर्घ्य द्यावा. आणखी वाचा
तूळ: आज सांसारिक जीवनाचा आनंद खर्या अर्थाने लुटाल. व्यापारी वर्गाला व्यापारात वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात सफलता व कीर्तीलाभ होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ संभवतो. जास्त यश मिळविण्यासाठी आपणास अतिरिक्त कष्ट करावे लागतील. वडिलांचा सल्ला आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. सूर्याष्टकाचे पठण आपणास लाभदायी होईल. आणखी वाचा
वृश्चिक: आज अचानक काही घटना घडतील. ठरलेल्या भेटी रद्द झाल्याने निराश व क्रोधीत व्हाल. हाती आलेली संधी सुटून जात असल्याचे दिसेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. प्राप्ती कमी व खर्च जास्त अशी स्थिती राहील. सासरच्या लोकांशी अत्यंत सावधपणे संवाद साधावा. रोज सूर्यास अर्घ्य द्यावा. दुर्गा चालिसाचे पठण करावे. आणखी वाचा
धनु: आज कार्यपूर्ती न झाल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. संतती विषयक बाबींमुळे चिंता वाढतील. शक्यतो आज प्रवास टाळावेत. वैवाहिक जोडीदार किंवा व्यावसायिक भागीदार यांच्याशी मतभेद संभवतात. आपले विचार इतरांवर लादू नका. रविवारी भगवान शंकरास जलाभिषेक करावा व गुळाचे दान द्यावे. आणखी वाचा
मकर: आज आपली मनःस्थिती व आरोग्य चांगले राहणार नाही. कौटुंबिक कटकटीमुळे मन दुःखी होईल. उत्साह व आनंद यांचा अभाव राहील. स्वजनांशी मतभेद होतील. मानहानी होऊ शकते. आपण विरोधकांवर मात कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना जास्त कष्ट करावे लागतील. रोज आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. आणखी वाचा
कुंभ: आज आपणास मनाने हलके वाटेल. चिंता नाहीशी होऊन उत्साह वाढेल. वेळ आनंदात जाईल. मित्रांच्या व आप्तांच्या भेटी होतील. विरोधकांवर मात करू शकाल. नशिबाची साथ लाभेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. शिक्षण व संतती संबंधी चिंता होऊ शकते. रोज सूर्यास कुंकू मिश्रित पाण्याचा अर्घ्य द्यावा. आणखी वाचा
मीन: आज आपणास खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. रागावर व वाणीवर ताबा ठेवावा लागेल. आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार सावधपणे करावे लागतील. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्यावर संयम ठेवावा लागेल. घरी आपणास काही महत्वाची कामे करावी लागू शकतात. रोज वडिलांचे आशीर्वाद घ्यावेत. आणखी वाचा