आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-08-15 07:08:54 | Updated: August 15, 2025 07:08 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: आजच्या दिवसाची सुरुवात आपण स्फूर्तीने व उत्साहाने कराल. मित्र व सगे सोयरे यांच्या येण्या-जाण्याने घरातील वातावरण आनंदाचे राहील. त्यांची अचानक भेट आपणास आनंदित करेल. आज आर्थिक फायदा होण्याची सुद्धा शक्यता आहे. प्रवासाची तयारी ठेवा. नवीन कामे सुरू करू शकाल. उत्तम भोजनाचा लाभ मिळेल. आणखी वाचा 

वृषभ: आज कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका. आज गैरसमज होण्याची शक्यता आहे. मन उदास बनेल. कुटुंबात मतभेद निर्माण झाल्याने आपले मन दुःखी होईल. कष्टाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे नाराज व्हाल. दिवस खर्चाचा आहे. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस व्यापारी वर्गासाठी शुभ फलदायी आहे. व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून लाभ होतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे. एखादी चांगली बातमी मिळेल. आणखी वाचा 

कर्क: नोकरी - व्यवसाय करण्यार्‍यांना आजचा दिवस खूप लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश होतील व त्यामुळे पदोन्नती होऊ शकते. वरिष्ठांशी महत्त्वपूर्ण बाबींवर मोकळेपणाने चर्चा करू शकाल. मन ताजे तवाने राहील. मातेशी चांगले संबंध राहतील. धन-मान-सन्मान मिळतील . घर सजावटीत आपण रस घ्याल. वाहनसौख्य मिळेल. सरकारकडून फायदा होईल. संसारिक सुखात वाढ होईल. आणखी वाचा 

सिंह: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या मंगलकार्यात हजेरी लावाल. न्यायी व्यवहार कराल. एखादा प्रवास ठरवाल. स्वास्थ्य साधारणच राहील. परदेशात राहणार्‍या आप्तांच्या बातम्या समजतील. वरिष्ठांशी मतभेद होतील. नोकरी - व्यवसायात अडथळे येतील. संततीची काळजी राहील. शरीरास थकवा, आळस व विमनस्कता जाणवेल. आणखी वाचा 

कन्या: आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. अती उत्साह व क्रोधाचे प्रमाण वाढल्याने आरोग्यावर ताण येण्याची शक्यता आहे. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. अवैध कामांपासून दूर राहावे. एखादा प्रवास संभवतो. सरकारविरोधी कृतीमुळे समस्या निर्माण होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस यशस्वितेचा व आनंदाचा आहे. सार्वजनिक जीवनाशी संबंधीत कार्यात यशस्वी व्हाल. मौजमजेसाठी खर्च होईल. नवीन वस्त्रालंकार खरेदी कराल. त्यांच्या वापरासाठी संधी मिळेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. उत्तम भोजन व वैवाहिक सौख्य मिळेल. आणखी वाचा 

वृश्चिक: आज कौटुंबिक शांतीचे वातावरण आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवू शकेल. नियोजित कामात यश मिळेल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्धी व शत्रूंवर मात करू शकाल. लाभ होईल. आर्थिक लाभ होईल. विशेष कामात खर्च होईल. आणखी वाचा 

धनु: आज आपणास रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही कामात यश न मिळाल्याने निराशा येण्याची शक्यता आहे. वाड्मय किंवा अन्य सृजनशील कलेप्रती आस्था राहील. संतती विषयक चिंता राहिल्याने मन बेचैन होईल. शक्यतो आज प्रवास टाळावा. आणखी वाचा 

मकर: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी कटुता निर्माण झाल्याने मनाची बेचैनी वाढेल. भोजन अवेळी होऊ शकते. शांत झोप मिळणार नाही. एखादी धनहानी व मानहानी संभवते. आणखी वाचा 

कुंभ: चिंता दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल. मनात उत्साह संचारल्यामुळे पूर्ण दिवस आनंदात जाईल. भावंडे व स्नेही ह्यांच्याशी वैचारिक एकोपा निर्माण होईल. एखादी महत्वपूर्ण योजना आखाल. जवळपास प्रवासाला जाण्याचा बेत ठरवू शकाल. आणखी वाचा 

मीन: वाद व संघर्ष टाळण्यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल. आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करताना सावध राहावे लागेल. शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा 

 

टॅग्स :दैनिक राशीभविष्यफलज्योतिषराशी भविष्यस्वातंत्र्य दिनजन्माष्टमी
Open in App