मेष: आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. शरीर व मन स्वस्थ राहील. त्यामुळे कामात उत्साह वाटेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसह आनंदात व उत्साहात वेळ जाईल. मातेकडून लाभ संभवतात. मित्र व संबंधितांमुळे घरातील वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा
वृषभ: आज आपणास सावध राहावे लागेल. आपल्या काळजीत भर पडेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नेत्र विकार संभवतात. कुटुंबीयांचा विरोध व रुसवा ह्यास सामोरे जावे लागेल. काम अपूर्ण राहील. अपेक्षेपेक्षा खर्च अधिक होईल व कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल. आणखी वाचा
मिथुन: आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. धनप्राप्तिस आजचा दिवस अनुकूल आहे. मित्राची अचानक झालेली भेट आनंददायी ठरेल. कुटुंबियांकडून लाभ संभवतो. स्वादिष्ट भोजन प्राप्ती होईल. आनंदाची बातमी मिळेल. नोकरी-व्यवसायात लाभ होतील. प्राप्तीत वाढ संभवते. वैवाहिक सौख्य लाभेल. आणखी वाचा
कर्क: आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपले प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. बढती संभवते. वरिष्ठांशी महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. कुटुंबियासह मनमोकळ्या गप्पा मारू शकाल. गृहसजावटीचे काम हाती घ्याल. कामासाठी प्रवास होतील. सरकारी लाभ होतील. प्रकृती उत्तम राहील. आणखी वाचा
सिंह: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. पूर्वनियोजित कामे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न कराल. आपल्या हातून योग्य तोच व्यवहार घडेल. मंगल कार्यात आपण सहभागी व्हाल. एखादा प्रवास संभवतो. काही कारणाने आपला संताप वाढेल. परदेशात राहणार्या नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. आणखी वाचा
कन्या: आजचा दिवस नवीन कामाचा शुभारंभ करण्यास अनुकूल आहे. मात्र, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे पदार्थ खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. खर्च वाढतील. वादापासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा. आणखी वाचा
तूळ: आजचा दिवस आनंददायी आहे. मित्रासह केलेल्या प्रवासातून आनंद मिळेल. नवीन वस्त्रालंकाराची खरेदी होऊ शकेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मान-सम्मान होतील. रुचकर भोजनाचा आस्वाद घेता येईल. वैवाहिक सौख्याची प्राप्ती होईल. आणखी वाचा
वृश्चिक: आज घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील. योग्य गोष्टींसाठी पैसा खर्च होईल. शत्रूवर मात करू शकाल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. माहेरहून चांगली बातमी ऐकावयास मिळेल. धनलाभ होईल. कामे पूर्ण होतील. आणखी वाचा
धनु: आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून, प्रवासात त्रास संभवतो. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्यांची काळजी राहील. कामे अपूर्ण राहिल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कला व साहित्याकडे मनाचा कल होऊन विविध कल्पना सुचतील. वाद होण्याच्या शक्यतेमुळे बौद्धिक चर्चेपासून दूर राहणे हितावह राहील. प्रेमीजनांसाठी आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आणखी वाचा
मकर: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. स्फूर्तीचा अभाव जाणवेल. कुटुंबियांशी वाद होऊन मतभेद झाल्याने मन व्यथित होईल. मानहानी संभवते. कोणत्याही कामात यश मिळणे अवघड होईल. झोप पूर्ण न झाल्याने आरोग्य बिघडेल. आणखी वाचा
कुंभ: आज आपल्या मनावरील चिंतेचे ओझे कमी झल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य सुद्धा उत्तम राहील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. विशेषतः भावंडांशी संबंधात गोडी निर्माण होईल. एखादा प्रवास संभवतो. आणखी वाचा
मीन: आज मनातून नकारात्मक विचार काढून टाकावे लागतील. वाद होण्याची शक्यता असल्याने रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल. खाण्या पिण्यावर संयम ठेवावा लागेल. आरोग्य मात्र नरम गरमच राहील. आणखी वाचा