आजचे राशीभविष्य: शुभ लाभाचा दिवस, विधायक कामे होतील; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2024-08-12 07:25:51 | Updated: August 12, 2024 07:25 IST

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष: वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला आहे. जोडीदारासह वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. आर्थिक लाभ तसेच प्रवास संभवतात. राग व अधिकार गाजविण्याची भावना वाढेल. आपल्या कामाचे कौतुक होईल. शक्यतो वाद टाळा. वाहनसुख चांगले मिळेल. आणखी वाचा 

वृषभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल. नियोजनाप्रमाणे सर्व कामे पार पडतील. आर्थिक लाभ संभवतात. एखादी चांगली बातमी मिळून काही लाभ होण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामे पूर्ण होतील. आणखी वाचा 

मिथुन: आज शरीर व मन बेचैन राहील. नवीन कार्य सुरू करण्याचा बेत आखाल पण काम सुरू करण्यात अडचणी येतील. मानहानी होण्याची शक्यता आहे. संतती विषयक कामासाठी खर्च करावा लागेल. जोडीदाराच्या तब्बेतीची चिंता वाटेल. विद्यार्थ्यांसाठी फार चांगला दिवस. प्रवासात त्रास संभवतो. आणखी वाचा 

कर्क: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आनंद व उत्साह यांचा अभाव राहील. मन चिंतेने ग्रासलेले व अशांत राहील. घरात भांडणाचे वातावरण असेल. आप्तांबरोबर मतभेद होऊ शकतात. तणाव राहील. पैसा खर्च होईल. अपयश मिळेल. झोपही शांत मिळणार नाही. मानहानी संभवते. आणखी वाचा 

सिंह: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. भावंडांसह आनंदात वेळ जाईल. फायदा होईल. सुंदर स्थळाला भेट देण्यास जाल. मित्र भेटतील. कार्य यशस्वी झाल्याने मित्र आनंदीत होतील. भावनिक संबंध प्रस्थापीत होतील. कलाक्षेत्रात रुची राहील. मानसिक दृष्टया दिवस चांगला जाईल. आणखी वाचा 

कन्या: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल. कामे सफल होण्याची जास्त शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ संभवतात. प्रवासाचे बेत ठरतील. बौद्धिक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल, मात्र त्यात संभाव्य वाद टाळावे लागतील. स्वादिष्ट बोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आयात-निर्यात संबंधित व्यापारात यश प्राप्ती होईल. आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. रचनात्मक व कलात्मक शक्तीची चमक दिसेल. विधायक कार्य हातून घडेल. खंबीर विचाराने काम पूर्ण कराल. आर्थिक योजना ठरवाल. प्रिय व्यक्तीसह दिवस आनंदात घालवू शकाल. अलंकार, मनोरंजन, आनंद इत्यादींसाठी पैसा खर्च होईल. आणखी वाचा 

वृश्चिक: आज मनोरंजन, आनंद ह्यासाठी पैसा खर्च होईल. चिंता व शारीरिक कष्ट ह्यामुळे आपण त्रासून जाल. गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. स्वभाव रागीट बनेल म्हणून भांडणापासून दूर राहावे लागेल. मानहानी व धनहानी होण्याची शक्यता आहे. अविचाराने केलेला व्यवहार अडचणीत आणू शकतो. आणखी वाचा 

धनु:  आर्थिक, सामाजीक व कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनात पूर्णतः आनंद मिळेल. प्रेमाचा सुखद आनंद घेऊ शकाल. मित्रांसह एखाद्या रम्य स्थळी फिरायला जावू शकाल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे. लाभ होईल. व्यापारात फायदा होऊन उत्पन्नात वाढ होईल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आणखी वाचा 

मकर: आजचा दिवस संघर्षाचा आहे. व्यापारात कार्यमग्न राहाल. व्यापारा निमित्त प्रवास करावा लागेल व त्याचा फायदा होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. नोकरीत बढती मिळेल. संततीच्या शिक्षणा विषयी समाधान वाटेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. पैसा व प्रतिष्ठा मिळेल. मित्र व नातेवाईकांकडून लाभ होतील. आणखी वाचा 

कुंभ: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. मनस्वास्थ्य चांगले राहील. कामाचा उत्साह कमी होईल. वरिष्ठांशी सांभाळून राहावे लागेल. अकारण खर्च वाढेल. आनंद - सोहळा, प्रवास- पर्यटन ह्यावर पैसा खर्च होईल. प्रवास व सहलीची शक्यता आहे. परदेशातून काही बातमी मिळेल. संतती विषयक काळजी राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. आणखी वाचा 

मीन: आज आपणास अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. मानसिक तसेच शारीरिक श्रमामुळे स्वास्थ्य खराब होऊ शकते. खर्चात वाढ होईल. इस्टेटीतून फायदा होईल. अवैध कामापासून दूर राहावे. आपले श्रम कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहा. आणखी वाचा 

 

टॅग्स :दैनिक राशीभविष्यफलज्योतिषराशी भविष्य
Open in App