मेष: आजचा दिवस समाजकार्य व मित्रांसोबत धावपळीत जाईल. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. सरकारी कामात मात्र यश मिळेल. वडीलधारी व आदरणीय व्यक्तींचा सहवास लाभेल. दूरवर राहणार्या संततीकडून आनंददायी बातम्या मिळतील. पर्यटनाला जाण्याची शक्यता आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील. आणखी वाचा
वृषभ: आज आपण नवे काम सुरू करू शकाल. नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे. नोकरीत पदोन्नती व पगार वाढीची बातमी मिळेल. सरकारकडून लाभ मिळेल. सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल. वरिष्ठ अधिकार्यांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आपला उत्साह वाढेल. अपूर्ण कामे तडीस जातील. दांपत्य जीवनात गोडी वाढेल. आणखी वाचा
मिथुन: आजचा दिवस नवीन काम सुरु करण्यास प्रतिकूल आहे. शरीरास थकवा व आळस असल्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. नोकरी - व्यवसायात प्रतिकूल वातावरण असेल. वरिष्ठांच्या नाराजीला तोंड द्यावे लागेल. खर्चात वाढ होईल. महत्वाच्या कामातील कोणताही निर्णय आज घेऊ नये. आणखी वाचा
कर्क: आज संताप व नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील. त्यामुळे आज संयम राखणे आवश्यक आहे. खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले नाही तर प्रकृती नक्कीच बिघडेल. कुटुंबात वादविवाद होतील. खर्चात वाढ झाल्याने आर्थिक चणचण भासेल. नवे संबंध उपयुक्त ठरतील. नवे काम सुरू न करणे हितावह राहील. आणखी वाचा
सिंह: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात मतभेद होण्याची शक्यता आहे. सामाजिक जीवनात यश मिळेल. सहवासाचा त्रास होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे. आणखी वाचा
कन्या: आज उत्साह व स्वास्थ्य उत्तम राहील. घरी व नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. कार्यात यशस्वी व्हाल. अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होईल. आणखी वाचा
तूळ: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संततीची काळजी सतावेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. आज सुरू केलेले काम पूर्ण होऊ शकणार नाही. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. एखादी मानहानी संभवते. शक्यतो प्रवास टाळावेत. आणखी वाचा
वृश्चिक: आजचा दिवस शक्य तितक्या शांतचित्ताने घालवावा. चिंतातुर मन व अस्वस्थ शरीर ह्याचा आपणास त्रास होईल. संबंधीतांशी मतभेद संभवतात. आर्थिक हानीची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचे दस्तावेज काळजीपूर्वक करावेत. आणखी वाचा
धनु: आजचा दिवस नव कार्यारंभास शुभ फलदायी आहे. भावंडांशी सलोखा वाढेल. तसेच कुटुंबीयांसह प्रवासाचे बेत ठरवाल. नशिबाची साथ लाभेल. गूढ विषयांची गोडी वाटेल. आज कार्यसिद्धीचा दिवस आहे. सामाजिक मान-सन्मान होतील. आणखी वाचा
मकर: आज कुटुंबियांशी वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यातील संयमच आपणाला वादातून बाहेर काढेल. बाजारात गुंतवणूक करण्याचे नियोजन कराल. प्रकृती साधारणच असेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे. आणखी वाचा
कुंभ: आज आपण शरीराने व मनाने उत्साहित असाल. आजचा दिवस लाभदायी आहे. मित्र - कुटुंबियांसह एखाद्या सहलीला जाऊ शकाल. एखाद्या विषयात प्रगती करू शकाल. मित्र व आप्तेष्ट ह्यांच्या कडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखी राहील. नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हितावह राहील. आणखी वाचा
मीन: आज अतीलोभ व हव्यास ह्यात आपण फसण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार सावधपणे करावेत. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. मनाची एकाग्रता होणार नाही. मांगलिक कार्यावर पैसा खर्च होईल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा