मेष: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कुटुंबीय, स्नेही व मित्रांसह एखाद्या स्नेहसंमेलनास उपस्थित राहाल. नवे कार्य हाती घेऊ शकाल. पण अती उत्साहाच्या भरात कामात बिघाड होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे सुद्धा लक्ष द्यावे लागेल. धन प्राप्ती संभवते. आणखी वाचा
वृषभ: आजचा दिवस शारीरिक व मानसिक दृष्टया व्यस्त राहण्याचा आहे. एखाद्या काळजीमुळे मनावर ताण येऊन मन:स्वास्थ्य मिळू शकणार नाही. कुटुंबीयांशी मतभेद झाल्याने घरातील वातावरण कलुषित होईल. कष्टाच्या मानाने अपेक्षित प्राप्ती होणार नाही. आणखी वाचा
मिथुन: आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील. समाजात मान व प्रतिष्ठा वाढेल. मित्रां कडून फायदाही होईल व त्यांच्यासाठी पैसेही खर्च होतील. एखाद्या सुंदर जागी पर्यटनासाठी गेल्याने संपूर्ण दिवस आनंददायी होऊ शकेल. आणखी वाचा
कर्क: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यापारी वर्गास लाभ होईल. नोकरीत बढती संभवते. कुटुंबात एकोपा राहील. नवीन सजावट करून घराची शोभा वृद्धिंगत कराल. आई कडून लाभ होईल. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता लाभेल. आणखी वाचा
सिंह: आज आळस, थकवा व ऊबग आपल्या कामाचा वेग कमी करतील. पोटाच्या तक्रारी मुळे अस्वस्थता अनुभवाल. नोकरी - व्यवसायात विघ्न संतोषी लोकांमुळे प्रगतीत अडथळा येईल. वरिष्ठांशी मतभेद होतील. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आणखी वाचा
कन्या: आज आपण एखादे काम हाती घेणे हिताचे ठरणार नाही. बाहेरचे खाण्यामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन हेच शस्त्र उपयुक्त ठरेल. पैसा जास्त खर्च होईल. हितशत्रू पासून सावध राहा. आणखी वाचा
तूळ: आज दैनंदिन कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून आपण मेजवानी, सिनेमा किंवा पर्यटन ह्यांची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल. भिन्नालिंगी किंवा प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आपणास खूप आनंद होईल. आणखी वाचा
वृश्चिक: कौटुंबिक वातावरण आनंद व उत्हासाने पूर्णपणे भरलेले असेल. शरीरात चैतन्य व उत्साह संचारेल. प्रतिस्पर्धी तसेच गुप्त शत्रू ह्यांच्यावर आपण मात करू शकाल. कामात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आणखी वाचा
धनु: पोटाच्या समस्या त्रास देतील. संततीचे स्वास्थ्य व अभ्यास ह्यामुळे चिंतित व्हाल. कार्य सफल न झाल्याने निर्माण होण्यार्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रणयासाठी मात्र अनुकूलता लाभेल. प्रिय व्यक्तीसह सुखद क्षणांचा अनुभव घेता येईल. आणखी वाचा
मकर: आज उत्साह व स्फूर्ती ह्यांचा अभाव असल्याने अस्वस्थता वाटेल. मनाला चिंता लागून राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन खिन्न होईल. वेळेवर भोजन व शांत झोप मिळणार नाही. आणखी वाचा
कुंभ: स्नेहसंमेलन किंवा प्रवासाच्या माध्यमातून कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. दांपत्य जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. आर्थिक लाभ व सामाजिक मान - प्रतिष्ठा मिळेल. आणखी वाचा
मीन: रागामुळे एखाद्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट वाढतील. विशेषतः डोळ्यांकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबीय व प्रियजन ह्यांच्याशी मतभेद संभवतात. विनाकारण खर्च होतील. आपल्या मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव होईल. आणखी वाचा