आजचे राशीभविष्य : ०५ जून २०२५; आज क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल, शुभ कार्याची प्रेरणा मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-06-05 07:35:29 | Updated: June 5, 2025 07:35 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष

05 जून, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी आहे. धनलाभा बरोबरच दीर्घकालीन आर्थिक नियोजनही करू शकाल. व्यापार करीत असाल तर व्यापार विस्ताराची योजना तयार कराल. तन व मन एकदम ताजेतवाने राहील. आणखी वाचा....

वृषभ

05 जून, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे. वैचारिक समृद्धी वाढेल व मन आनंदी रहील. शुभ कार्याची प्रेरणा मिळेल. आणखी वाचा...

मिथुन

05 जून, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. वैवाहिक जोडीदार व संतती ह्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. शक्यतो वाद -विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहावे. मानहानी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा....

कर्क

05 जून, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. ग्लानीमुळे आज आपले मन दुःखी होईल. प्रफुल्लता, स्फूर्ती व आनंद ह्यांचा अभाव राहील. कुटुंबीयांशी मतभेद वाढतील. आणखी वाचा...

सिंह

05 जून, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळे द्विधा अवस्था होईल. तरीही कुटुंबीयांसह चांगले वातावरण राहील्याने आपली प्रसन्नता वाढेल. आणखी वाचा...

कन्या

05 जून, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड बोलण्याने आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळावी. आणखी वाचा...

तूळ

05 जून, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज आपणास क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. शक्यतो वाद टाळावेत. कुटुंबियांशी एखाद्या विषयावर वाद संभवतात. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. विशेषतः डोळ्यांची निगा राखावी लागेल. आणखी वाचा...

वृश्चिक

05 जून, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. सांसारिक सौख्य मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. आणखी वाचा...

धनु

05 जून, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. आणखी वाचा...

मकर

05 जून, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. बौद्धिक व व्यावसायिक क्षेत्रात आपण नव्या विचारांनी प्रभावित व्हाल. सृजनात्मक क्षेत्रात नवीन रचना क्षमतेचा परिचय करून द्याल. आणखी वाचा...

कुंभ

05 जून, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र उत्तम राहील. शरीरात स्फूर्तीचा अभाव असल्याने काम करण्यात उत्साह वाटणार नाही. आणखी वाचा...

मीन

05 जून, 2025 गुरूवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आजारपणावर अतिरिक्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा...

टॅग्स :फलज्योतिषदैनिक राशीभविष्यराशी भविष्य
Open in App