आजचे राशीभविष्य, ५ एप्रिल २०२५: नवीन कार्यात यशस्वी व्हाल, 'या' राशीच्या लोकांनी सावध राहा !

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-04-05 07:19:00 | Updated: April 5, 2025 07:19 IST

Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Open in app

मेष - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. नवे कार्य करण्याची प्रेरणा मिळून त्याचा आरंभ सुद्धा कराल. शीघ्र गतीने विचारात बदल होऊन मनाची अवस्था द्विधा होईल. आज नोकरी - व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. आणखी वाचा...

वृषभ -  आपली अनिर्णायकी अवस्था झाल्याने हाती आलेली सोनेरी संधी आज आपण गमावून बसाल. मनात वैचारिक गोंधळ उडाल्याने आज आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. आणखी वाचा...

मिथुन - आज दिवसाची सुरुवात प्रफुल्लित मन व स्वस्थ चित्ताने होईल. मित्र व नातलगांसह सहभोजनाचा आनंद लुटाल. सुंदर वस्त्रे परिधान कराल. आर्थिक दृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. आणखी वाचा...

कर्क - आज मानसिक अस्वस्थता जाणवेल. त्यामुळे आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. संबंधितांचे गैरसमज झाल्याने आपण व्यथित व्हाल. कौटुंबिक बाबींवर खर्च होईल. शक्यतो वाद टाळावेत. आणखी वाचा...

सिंह - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. तरीही द्विधा मनःस्थितीमुळे हातची संधी जाण्याची शक्यता आहे. मनात विचारांचे काहूर माजेल. द्विधा मनःस्थितीमुळे नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील. आणखी वाचा...

कन्या - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यात यशस्वी होऊ शकाल. व्यापारी व नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. आणखी वाचा...

तूळ - आज आपण बौद्धिक व लेखन कार्यात व्यस्त राहाल. आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. एखादा दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. व्यापार - व्यवसायात मोठा फायदा संभवतो. आणखी वाचा...

वृश्चिक - आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. शक्यतो आज नवीन कार्याची सुरुवात करु नये. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कृत्या पासून दूर राहणे हितावह राहील. हातून एखादा राजद्रोह घडण्याची शक्यता आहे. आणखी वाचा...

धनु - आजचा दिवस आनंददायी व समाधान मिळवून देणारा आहे. मनोरंजन, मेजवानी, सहल, प्रवास, मित्र व प्रिय व्यक्तीचा सहवास तसेच सुंदर वस्त्र लाभ हि आजच्या दिवसाचे वैशिष्ठय असेल. आणखी वाचा...

मकर - आजचा दिवस व्यापार - व्यवसायातील प्रगती व आर्थिक नियोजन यासाठी अनुकूल आहे. वसुली तसेच आर्थिक देवाण- घेवाणीत यश मिळेल. आयात - निर्यातीचा व्यापार करणार्‍यांना फायदा होईल. आणखी वाचा...

कुंभ - आजचा दिवस मानसिक अशांतता व उद्विग्नता यांनी भरलेला आहे. सातत्याने विचार बदलत राहतील त्यामुळे निर्णायकता असणार नाही. ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. आणखी वाचा...

मीन - आज दक्षता बाळगण्याची गरज आहे. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आईची प्रकृती हा चिंतेचा विषय होईल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक उद्वेग, धनहानी व मानहानी होईल. आणखी वाचा...

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App