Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, २७ जानेवारी २०२६: धनलाभ होईल, वाणीवर संयम ठेवा, सहलीचे नियोजन कराल !

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-01-27 07:17:312026-01-27 07:44:19 | Updated: 2026-01-27 07:44:19

Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Open in app

मेष: स्नेही, मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह एखाद्या स्नेहसंमेलनास जाऊ शकाल. दुपारनंतर मात्र काही कारणास्तव आपली प्रकृती नरम गरम होईल. आहाराकडे लक्ष द्या. आर्थिक देवाण-घेवाणीत सावध राहा. आणखी वाचा

वृषभ: घराच्या नूतनीकरणासाठी काही तरतूद कराल. घरी मातेशी व नोकरीत वरिष्ठांशी संबंधातील सौहार्दता वाढेल. दुपार नंतर आपण सामाजिक कार्यात जास्त रस घ्याल. मित्रांकडून लाभ होईल. आणखी वाचा

मिथुन: आज मित्रांकडून आपणास लाभ होईल. भविष्यात फायदा होऊ शकेल अशा नवीन लोकांच्या ओळखी होतील. धनलाभ होईल. प्रवासाचे व सहलीचे नियोजन करू शकाल. दुपारनंतर थोडे सावध राहा. आणखी वाचा

कर्क: आज आपण नियोजित कार्य करण्यास प्रेरित व्हाल. मात्र, आपणास त्यात अपेक्षित यश न मिळाल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या आरोग्यावर होईल. दुपारनंतर शारीरिक उत्साहामुळे थोडाफार आनंद मिळवू शकाल. आणखी वाचा

सिंह: आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक व मानसिक आरोग्य नरम गरमच राहील. आपला संताप वाढल्याने इतरांशी मतभेद होतील. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी होईल. आणखी वाचा

कन्या: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. नवीन कार्यारंभात व प्रवासात अडचणी येतील. आज कोणत्याही बाबतीत लाभ, लोभ, द्वेष, प्रेम व तिरस्कार इत्यादी भावना मनात न ठेवता सम भावना बाळगल्यास आपली कामे होऊ शकतील. आणखी वाचा 

तूळ: ज्या क्षेत्रात आपण वावराल त्या क्षेत्रात आपली प्रशंसा केली जाईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. दुपारनंतर कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा 

वृश्चिक: आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा आहे. व्यापार - व्यवसायात आपण व्यस्त राहाल व त्यातून लाभ सुद्धा होतील. अनेक लोकांच्या सहवासाने विचारांची देवाण - घेवाण होईल. कौटुंबिक व वैवाहिक जीवन समाधानाचे राहील. आणखी वाचा 

धनु: आजच्या दिवसाची सुरवात शारीरिक व मानसिक थकव्याने होईल. कष्टाच्या प्रमाणात अपेक्षित यश प्राप्ती होणार नाही. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आप्तेष्टांसह दिवस आनंदात घालवू शकाल. आणखी वाचा 

मकर: आज आपण अती भावनाशील व्हाल. संपत्ती संबंधी दस्तावेजात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मानसिक त्रास संभवतो. प्रकृतीची काळजी घ्या. शासकीय विषयात यशस्वी व्हाल. अपघाताची शक्यता असल्याने शक्यतो प्रवास टाळावेत. आणखी वाचा

कुंभ: आज आपले विचार स्थिर राहणार नसल्याने कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. इतरांच्या वागण्या बोलण्याने आपले मन दुखावले जाऊ शकते. वैचारिक गोंधळामुळे आज संपत्ती संबंधित कोणताही व्यवहार न करणे हितावह राहील. आणखी वाचा

मीन: आज आपणास आपल्या स्वार्थाचा त्याग करावा लागेल. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. वाद व मनःस्ताप टाळण्यासाठी आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. कामासाठी एखादा प्रवास संभवतो. आणखी वाचा

English
हिंदी सारांश
Web Title : January 27, 2026 Horoscope: Financial gains, control speech, plan trip!

Web Summary : Mixed day predicted. Focus on family, health. Gemini may gain money, plan trips. Cancer needs to manage health. Libra should control speech. Overall, a day of varied experiences.
Web Title : 27 जनवरी 2026 राशिफल: धन लाभ, वाणी पर संयम, यात्रा की योजना!

Web Summary : मिश्रित दिन की भविष्यवाणी की गई है। परिवार, स्वास्थ्य पर ध्यान दें। मिथुन राशि वालों को धन लाभ हो सकता है, यात्रा की योजना बन सकती है। कर्क राशि वालों को स्वास्थ्य का प्रबंधन करना चाहिए। तुला राशि वालों को वाणी पर नियंत्रण रखना चाहिए। कुल मिलाकर, विविध अनुभवों का दिन।
टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App