Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, २६ जानेवारी २०२६: मन टवटवीत राहिल, सुग्रास भोजन मिळेल, मित्रमंडळी भेटतील !

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-01-26 07:37:292026-01-26 07:38:33 | Updated: 2026-01-26 07:38:33

Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...

Open in app

मेष: आज आपले प्रत्येक काम उत्साह व आवेश यांनी पूर्णतः भरलेले असल्याचा अनुभव आपणास येईल. शरीर व मन स्फूर्ती आणी टवटवीतपणाने भरेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मित्र व स्नेही यांच्यासह आनंदात वेळ घालवाल. आणखी वाचा 

वृषभ: आज क्रोध व निराशेची भावना मनात पसरेल. प्रकृती साथ देणार नाही. घर - परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील. आपली उग्र वाणी कोणाशी मतभेद किंवा भांडणाचे कारण बनू शकेल. परिश्रम वाया जात आहेत असे वाटेल. आणखी वाचा

मिथुन: आज विविध मार्गांनी लाभ झाल्यामुळे हर्षोल्हास वाढेल. पत्नी व संतती कडून फायदेशीर बातमी मिळेल. मित्रांशी संवाद साधल्याने आनंद मिळेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. सुग्रास भोजनाचा आस्वाद घेता येईल. आणखी वाचा 

कर्क: आज गृह सजावटीवर आपण विशेष लक्ष द्याल. घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल. व्यापारी व नोकरदार लाभाची किंवा बढतीची अपेक्षा करू शकतात. कुटुंबात सुख - शांती नांदेल. सरकारी लाभ मिळतील. आणखी वाचा

सिंह: आजचा दिवस आळस व थकवा ह्यात जाईल. आपल्या तापॅट स्वभावामुळे मानसिक तणाव राहील. पोट दुखीने हैराण व्हाल. यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. नकारात्मक विचार, वर्तन व नियोजन ह्या पासून दूर राहावे. आणखी वाचा 

कन्या: आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील. आज आपला आवेश व क्रोध वाढणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. स्नेही व कुटुंबीयांशी जोराचे वाद झाल्याने आपण दुःखी व्हाल. शक्यतो प्रवास टाळा. आणखी वाचा 

तूळ: आज सांसारिक जीवनाचा आनंद खर्‍या अर्थाने लुटाल. सामाजिक हेतूने कुटुंबीयांसह बाहेर जावे लागेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. व्यापारी वर्गाला व्यापारात वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात सफलता व कीर्तीलाभ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

वृश्चिक: आज अचानक काही घटना घडतील. ठरलेल्या भेटी रद्द झाल्याने निराश व क्रोधीत व्हाल. हाती आलेली संधी सुटून जात असल्याचे दिसेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. मातुला कडून एखादी अप्रिय बातमी मिळाल्याने मन व्यथित होईल. आणखी वाचा 

धनु: आज आपण संततीचा अभ्यास व स्वास्थ्य ह्यामुळे चिंतीत व्हाल. पोटाच्या तक्रारी सतावतील. कामातील अपयशाने आपण निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. साहित्य, लेखन व कला ह्या विषयांची गोडी वाढेल. आणखी वाचा 

मकर: आज आपली मनःस्थिती व आरोग्य चांगले राहणार नाही. कौटुंबिक कटकटीमुळे मन दुःखी होईल. उत्साह व आनंद यांचा अभाव राहील. स्वजनांशी मतभेद होतील. छाती संबंधी आजार होऊ शकतो. झोप येणार नाही. मानहानी होऊ शकते. आणखी वाचा 

कुंभ: आज आपणास मनाने हलके वाटेल. चिंता नाहीशी होऊन उत्साह वाढेल. घरात भावंडांसह काही आयोजन कराल. त्यांच्यासह वेळ आनंदात जाईल. मित्रांच्या व आप्तांच्या भेटी होतील. जवळच्या ठिकाणी सहलीसाठी जाऊ शकाल. आणखी वाचा 

मीन: आज आपणास खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. रागावर व वाणीवर सुद्धा ताबा ठेवावा लागेल. आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार सावधपणे करावे लागतील. शारीरिक व मानसिक आरोग्य मध्यम राहील. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

English
हिंदी सारांश
Web Title : Horoscope, January 26, 2026: Refreshed mind, delicious food, friends meet!

Web Summary : Aries will be energetic; Taurus, frustrated. Gemini gains joy, while Cancer focuses on home. Leo feels lazy; Virgo, restrained. Libra enjoys life; Scorpio faces disruptions. Sagittarius worries; Capricorn feels unwell. Aquarius feels light; Pisces needs financial control.
Web Title : आज का राशिफल, 26 जनवरी 2026: मन प्रफुल्लित, स्वादिष्ट भोजन, मित्रों से मुलाकात!

Web Summary : मेष राशि वाले ऊर्जावान रहेंगे; वृषभ, निराश। मिथुन को आनंद मिलेगा, जबकि कर्क घर पर ध्यान केंद्रित करेगा। सिंह आलसी महसूस करेगा; कन्या, संयमित। तुला जीवन का आनंद लेगा; वृश्चिक को व्यवधानों का सामना करना पड़ेगा। धनु चिंतित; मकर अस्वस्थ महसूस करेगा। कुंभ हल्का महसूस करेगा; मीन को वित्तीय नियंत्रण की आवश्यकता है।
टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App