Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-04-17 07:29:082026-04-17 07:29:31 | Updated: 2026-04-17 07:29:31

Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस

Open in app

मेष: आज मनाची एकाग्रता कमी झाल्याने मनास दुःख होईल. मानसिक ताण जाणवेल. गुंवणूकीतून फारसा लाभ होणार नसल्याने आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. महत्वाच्या कागदपत्रांच्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा

वृषभ: आजचा दिवस व्यावहारिक कार्ये पूर्ण करण्याच्या दृष्टिने शुभ फलदायी आहे. मित्र व वडीलधार्‍यांचा सहवास लाभेल. नवे मित्र होतील व ती मैत्री दीर्घकाल टिकून राहील. संततीच्या प्रगतीमुळे मनाला आनंद मिळेल. प्रवास संभवतात. आणखी वाचा

मिथुन: आजचा दिवस पूर्णतः अनुकूल व लाभदायी आहे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन झाल्याने आपला प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. व्यापारात उत्पन्न वाढेल व जुनी येणी वसूल होतील. वडील व वयस्कर यांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. आणखी वाचा

कर्क: आज वरिष्ठांशी वाद होण्याच्या शक्यतेमुळे उक्ती व कृती संयमित ठेवावी लागेल. शारीरिक अस्वास्थ्य व मानसिक चिंता राहील. व्यापारात विघ्ने येतील. दुपार नंतर मात्र व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आणखी वाचा

सिंह: आज वाद होण्याची शक्यता असल्याने संताप व वाणी ह्यावर संयम ठेवावा लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कृत्य घडण्याची शक्यता आहे. मानसिक व्यग्रता राहील. आणखी वाचा 

कन्या: आज आपणास आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. सामाजिक मान - सन्मान होतील. व्यवसायात भागीदारी करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. करमणुकीमुळे दिवस आनंदात जाईल. व्यापारी येणी वसूल होतील. आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. कोणतेही कार्य खंबीर मनाने व आत्मविश्वासाने पूर्ण कराल. मन शांत ठेवा. घरातील वातावरण आनंददायी व शांत राहील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. कलावंतांना आजचा दिवस शुभ आहे. आणखी वाचा

वृश्चिक: आजचा दिवस साहित्यिकांना अनुकूल आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. शेअर्स, लॉटरी यात लाभ होईल. खंबीर मन व आत्मविश्वास वाढेल. प्रकृती उत्तम राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आणखी वाचा

धनु: आज आपणात शारीरिक व मानसिक स्फूर्ती व उत्साह ह्यांचा अभाव राहील. कुटुंबात क्लेश व कलहजन्य वातावरण राहिल्याने मनात उदासीनता राहील. निद्रानाशाचा त्रास होईल. आईची प्रकृती बिघडेल. आणखी वाचा

मकर: आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा आहे. जोडीदाराशी संबंधातील गोडवा टिकून राहील. मित्रांसह एखाद्या सहलीचे आयोजन कराल. भावंडे व नातलगांशी चांगले संबंध राहतील. मान सम्मान वाढेल. आणखी वाचा 

कुंभ: आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच संतापावर व जिभेवर ताबा ठेवावा लागेल. त्यामुळे कोणाशी कटुता येणार नाही व मनातून नकारात्मक विचार दूर होतील. सृजनशील व कलात्मक गोष्टींकडे आपला कल राहील. आणखी वाचा

मीन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल्याने आपण उत्साहित राहाल. नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबीयांसह वेळ आनंदात घालवाल. मनावर संयम ठेवा. आणखी वाचा

English
हिंदी सारांश
Web Title : Daily Horoscope, April 17, 2026: Fruitful Day, Mental Health Benefits

Web Summary : Aries may face stress, while Taurus enjoys beneficial activities. Gemini sees career progress. Cancer should control speech. Libra finds peace. Scorpio benefits from gains. Sagittarius feels low. Capricorn enjoys marital bliss. Aquarius needs to control expenses. Pisces will have a good day with family.
Web Title : आज का राशिफल, 17 अप्रैल, 2026: फलदायी दिन, मानसिक स्वास्थ्य लाभ

Web Summary : मेष राशि वाले तनाव का सामना कर सकते हैं, जबकि वृषभ राशि वाले लाभकारी गतिविधियों का आनंद लेंगे। मिथुन राशि वाले करियर में प्रगति देखेंगे। कर्क राशि वालों को वाणी पर नियंत्रण रखना चाहिए। तुला राशि वाले शांति का अनुभव करेंगे। वृश्चिक राशि वालों को लाभ होगा। धनु राशि वाले उदास महसूस करेंगे। मकर राशि वाले वैवाहिक सुख का आनंद लेंगे। कुंभ राशि वालों को खर्चों को नियंत्रित करने की आवश्यकता है। मीन राशि वालों का परिवार के साथ अच्छा दिन बीतेगा।
टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App