८५ वर्षांवरील नागरिकांना मतदान करण्यासाठी केंद्रावरच यावे लागणार; यावेळी गृहमतदानाची सुविधा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:26 IST2026-01-13T17:25:14+5:302026-01-13T17:26:54+5:30

Amravati : गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी ८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना घरूनच मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध केली होती.

Citizens above 85 years of age will have to come to the center to vote; there is no home voting facility this time | ८५ वर्षांवरील नागरिकांना मतदान करण्यासाठी केंद्रावरच यावे लागणार; यावेळी गृहमतदानाची सुविधा नाही

Citizens above 85 years of age will have to come to the center to vote; there is no home voting facility this time

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी ८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना घरूनच मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध केली होती. मात्र, महापालिका निवडणुकीसाठी अशी सुविधा मिळणार नाही. त्यामुळे या ८५ वर्षावरील नागरिकांना मतदानासाठी केंद्रावरच यावे लागणार आहे.

या मतदारांकरिता केंद्रावर व्हीलचेअरची उपलब्धता राहणार आहे तसेच गरोदर आणि ज्येष्ठ नागरिक महिलांसाठीही सुविधा उपलब्ध असतील, असे यंत्रणेने सांगितले. महापालिकेच्या निवडणुकीत ८०५ केंद्रांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण सहा लाख ४७ हजार ०५९ एवढे मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात ज्येष्ठ नागरिक, वृद्ध, दिव्यांग मतदार याशिवाय गरोदर महिला, लहान मूल असलेल्या महिला यांचाही समावेश आहे. या सर्व मतदारांसाठी विविध प्रकारच्या सुविधा केंद्रावर उपलब्ध केल्या जाणार आहेत. या सर्व यंत्रणांची तयारी प्रशासकीय स्तरावर सुरू आहे. सध्या टपाली मतदान तसेच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यासह मतदान प्रक्रियेच्या साहित्याची तयारी अंतिम टप्प्यात सुरू आहे. एकीकडे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना, दुसरीकडे शारीरिकदृष्ट्या हतबल असलेल्या ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांची अडवणूक केली जात आहे.

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर

लोकसभा, विधानसभेवेळी ८५ वर्षावरील वृद्धांना केंद्रावर न येता त्यांच्या घरूनच मतदान करून घेण्यात आले होते. मात्र, मनपा निवडणुकीत ही सुविधा नसल्याने ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांसाठी केंद्रावर व्हीलचेअर सुविधा उपलब्ध केली आहे.

शहरात ८०५ मतदान केंद्रे

महापालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला होणाऱ्या मतदान प्रक्रियेत एकूण ८०५ मतदान केंद्रे राहणार आहेत. यामध्ये सर्व केंद्रांवर वीज, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह अशा सुविधा उपलब्ध केल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.

मतदानात राहणार प्राधान्यक्रम

महापालिकेच्या निवडणुकीसाठी नेहमीच चुरशीने मतदान होते. अनेक केंद्रांवर रांगा लागलेल्या असतात. अशा केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर व लहान बाळ असलेल्या महिलांना मतदानासाठी रांगेत प्राधान्य देण्यात येणार आहे. वृद्ध व दिव्यांग मतदारांना रॉप, व्हीलचेअर यांची व्यवस्था मतदान केंद्रांवर करण्यात आली आहे.

शहरात सात 'पिंक' मतदान केंद्रे

यावेळी महिला अधिकारी व कर्मचारी यांचे प्रत्येक झोनमध्ये एक याप्रमाणे सात 'पिंक' मतदान केंद्रे राहणार आहेत. शिवाय वेगवेगळ्या थीमवर सात मतदान केंद्रे राहतील, अशी माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त तथा पीआरओ भूषण पुसदकर यांनी दिली.

'व्हीलचेअर'ची सुविधा

निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत. प्रत्येक केंद्रावर रॅम्पची व्यवस्था असेल. चालण्यास असमर्थ असलेल्या मतदारांसाठी 'व्हीलचेअरची सुविधा पुरविली येणार आहे. वृद्ध, दिव्यांग, आजारी व्यक्तींना रांगेत उभे न राहता थेट मतदानासाठी प्राधान्य दिले जाईल.

आयोगाच्या निर्देशानुसार नियोजन

महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार निवडणुक यंत्रणेतून उपायोजनाबाबत नियोजन केले आहे.

"महापालिका निवडणुकीत गृहमतदानाची सुविधा नाही. मात्र, ज्येष्ठ, दिव्यांग व महिलांसाठी सर्व आवश्यक सुविधा सर्व मतदान केंद्रांवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मतदारांनी निर्भयपणे व उत्साहाने मतदान करावे."
- विजय लोखंडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी
 

Web Title : 85 वर्ष से अधिक उम्र के लोगों के लिए गृह मतदान नहीं; केंद्र पर ही आना होगा।

Web Summary : निगम चुनावों में 85 वर्ष से अधिक आयु वालों को केंद्र पर ही मतदान करना होगा। वरिष्ठ नागरिकों, गर्भवती महिलाओं और विकलांगों के लिए 805 मतदान केंद्रों पर व्हीलचेयर और प्राथमिकता मिलेगी।

Web Title : No home voting for 85+ in corporation elections; must visit center.

Web Summary : Those above 85 must vote at the center for corporation elections. Wheelchairs and priority access will be available for senior citizens, pregnant women, and the disabled at 805 polling centers.