१० प्रभागांत 'हॉट सीट'; निवडणुकीत 'बिग फाइट', भाजपचे महानगराध्यक्ष, माजी महापौर, सभापतींच्या लढतीकडे लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 17:54 IST2026-01-12T17:52:17+5:302026-01-12T17:54:08+5:30

अकोला महानगरपालिका निवडणुकीत यावेळी अनेक प्रभाग असे आहेत जिथे तिरंगी आणि चौरंगी लढती होताना दिसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी निवडणुकीला रंगत आली आहे.

'Hot seats' in 10 wards; 'Big fight' in the elections, focus on the fight between BJP's metropolitan president, former mayor, and speaker! | १० प्रभागांत 'हॉट सीट'; निवडणुकीत 'बिग फाइट', भाजपचे महानगराध्यक्ष, माजी महापौर, सभापतींच्या लढतीकडे लक्ष!

१० प्रभागांत 'हॉट सीट'; निवडणुकीत 'बिग फाइट', भाजपचे महानगराध्यक्ष, माजी महापौर, सभापतींच्या लढतीकडे लक्ष!

Akol Municipal Election 2026: अकोला महानगरपालिका निवडणुकीत यंदा अनेक प्रभागांत थेट, तिरंगी आणि चौरंगी अशा चुरशीच्या लढती रंगल्या आहे, तर १० प्रभागात पदाधिकारी व नेत्यांच्या 'बिग फाइट' होत आहेत. भाजप, काँग्रेस, उद्धवसेना, शिंदेसेना, राष्ट्रवादी (शरद पवार व अजित पवार पक्ष), वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएम यांच्या तुल्यबळ उमेदवारांमुळे या प्रभागांतील निवडणूक रंगतदार झाली आहे.

प्रभाग क्रमांक ५ मध्ये दोन जागांवर थेट 'बिग फाइट' होत आहे. प्रभाग ५-बमध्ये भाजप महानगराध्यक्ष जयंत मसने आणि उद्धवसेनेचे मनीष मोहोड आमने-सामने आहेत, तर प्रभाग ५-ड मध्ये भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांच्याविरोधात उद्धवसेनेचे नवखे दीपक गवारे, काँग्रेसचे रवी पाटणे आणि वंचितचे शुद्धोधन पळसपगार यांच्यात चौरंगी लढत आहे. 

प्रभाग ६-क मध्ये माजी नगरसेविका सारिका जयस्वाल आणि भाजप गटनेते राहुल देशमुख यांच्या अर्धांगिनी निकिता देशमुख यांच्यातील लढत लक्षवेधी आहे. प्रभाग ७-ड मध्ये महानगर विकास समितीचे माजी उपमहापौर सुनील मेश्राम, माजी नगरसेवक शेख फरीद, एमआयएमचे रशीद खान लोधी आणि वंचितचे महेंद्र डोंगरे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.

१५ मध्ये अनुभवी विरुद्ध नवखे !

प्रभाग १५-डमध्ये मनपा स्थायी समितीचे माजी सभापती भाजपचे बाळ टाले यांच्यासमोर
गेल्यावेळीही निवडणूक लढलेले उद्धवसेनेचे लक्ष्मण पंजाबी, शिंदेसेनेचे समर्थ शर्मा आणि काँग्रेसचे प्रशांत प्रधान यांच्यात बहुरंगी लढत होताना दिसत आहे. अनुभवी विरुद्ध नवखे अशी ही लढत होत असल्याने, या
लढतीकडे लक्ष लागले आहे.

प्रभाग १६, १७ आणि २० : प्रतिष्ठेचा सवाल

प्रभाग १६-ड मध्ये भाजपचे माजी स्थायी समिती सभापती संजय बडोणे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे माजी स्थायी समिती सभापती रफिक सिद्दीकी यांच्यात काट्याची लढत होत आहे.

प्रभाग १७-ड मध्ये भाजपचे करण साहू यांच्यासमोर काँग्रेसचे आझाद खान, शिंदेसेनेचे शहरप्रमुख व माजी नगरसेवक राजेश मिश्रा आणि एआयएमआयएमचे फैसल अहमद यांचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे या चौघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.

माजी उपमहापौर, माजी नगरसेवक लढत रंगतदार

भाजप-उद्धवसेना थेट संघर्ष प्रभाग २०-अमध्ये माजी नगरसेवक विजय इंगळे (उद्धवसेना) आणि भाजपचे नवखे उमेदवार मंगेश झिने यांच्यात काट्याची लढत अपेक्षित आहे. तर प्रभाग २०-डमध्ये भाजपचे माजी उपमहापौर विनोद मापारी आणि उद्धवसेनेचे शंकर लंगोटे यांच्यात थेट सामना रंगला आहे. या सर्वांच्या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

Web Title : अकोला नगर निगम चुनाव: 10 वार्डों में 'बड़ी टक्कर'; महत्वपूर्ण लड़ाई

Web Summary : अकोला में नगर निगम चुनाव में 10 वार्डों में 'बड़ी टक्कर' है। भाजपा नेताओं का शिवसेना और कांग्रेस उम्मीदवारों से मुकाबला है। पूर्व महापौर और समिति प्रमुखों की लड़ाई महत्वपूर्ण है, जिससे यह चुनाव उच्च दांव वाला बन गया है।

Web Title : Akola Municipal Election: 'Big Fights' in 10 Wards; Key Battles

Web Summary : Akola faces fierce municipal elections with 'big fights' in 10 wards. BJP leaders clash with Shiv Sena and Congress candidates. Key battles include former mayors and committee heads, making it a high-stakes election.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.