पिंपळनेर, कापडणे परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस; शेतशिवारातील गोडावूनवरील पत्रे उडाली

By अतुल जोशी | Published: May 16, 2024 07:36 PM2024-05-16T19:36:25+5:302024-05-16T19:36:40+5:30

वार्सा येथील शेतशिवारातील गोडावूनवरील पत्रे उडाली

Rain with gale in Pimpalner, Kapdane area leaves on the Godavoon in the farm were blown away | पिंपळनेर, कापडणे परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस; शेतशिवारातील गोडावूनवरील पत्रे उडाली

पिंपळनेर, कापडणे परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस; शेतशिवारातील गोडावूनवरील पत्रे उडाली

धुळे : साक्री तालुक्यातील पिंपळनेर शिवारातील वार्सा, सिताडीपाडा परिसरात गुरुवारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वाऱ्यामुळे शेतशिवारातील गोडावूनवरील पत्रे उडाली, घरावरील कौल फुटले. सुदैवाने कुठली जीवितहानी झालेली नाही. धुळे कापडण्यातही अर्धा तास पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी डबके साचले.

पिंपळनेर येथे गुरुवारी दुपारी २० मिनिटे हजेरी लावल्याने भाजीपाल्यासह वीट उत्पादकांचे नुकसान झाले आहे. तर कापडणे येथेही गुरूवारी दुपारी विजांचा कडकडाट करत पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे गल्लीबोळातून पाणी वाहू लागले होते. दरम्यान, धुळ्यातही सायंकाळी पावसाचे वातावरण तयार झाले होते.

Web Title: Rain with gale in Pimpalner, Kapdane area leaves on the Godavoon in the farm were blown away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.