चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे इंस्टावर आपल्या ट्रेडिशनल अंदाजाने चाहत्यांना पाडतेय भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 05:26 PM2018-11-14T17:26:38+5:302018-11-14T17:49:29+5:30

अनन्या पांडे हल्ली सोशल मीडियावर असते सक्रीय. ती आपले नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अनन्याचे चाहते तिचा आगामी चित्रपट स्टुडंट ऑफ द इयर २चे उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

अनन्या स्टुडंट ऑफ द इयर २मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली होत आहे.

अनन्याच्या या सिनेमाचे दिग्दर्शन पुनीत मल्होत्रा करत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत.

स्टुडंट ऑफ द इयर २मध्ये अनन्या पांडेसोबत तारा सुतारियादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

शाहरूख खानची मुलगी सुहाना खान आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूर अनन्या पांडेची बेस्ट फ्रेंड्स आहेत.

सुहाना, शनाया व अनन्या बऱ्याचदा एकत्र पार्टी करताना दिसतात.