हे बॉलिवूडचे चित्रपट चीनमध्ये ठरले हिट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 07:20 PM2019-04-15T19:20:16+5:302019-04-15T19:33:22+5:30

आयुषमान खुराणा आणि तब्बू यांची मुख्य भूमिका असलेल्या अंधाधुन या चित्रपटाने चीनमध्ये आतापर्यंत २०० कोटी रुपये कमावले असून आजही या चित्रपटाला तिथे प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

राणी मुखर्जीच्या हिचकी हा चित्रपट देखील चीनमधील लोकांना आवडला. या चित्रपटाने १५० कोटी इतकी कमाई केली.

आमिर खान आणि अनुष्का शर्माच्या पीकेने चीनमध्ये १०० कोटी हून अधिक कलेक्शन केले आहे.

इरफान खानच्या हिंदी मीडियमला देखील चीनमध्ये खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने २१८ कोटीटे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले.

आमिर खानची मुख्य भूमिका असलेल्या दंगल या चित्रपटाने चीनमध्ये 1850 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

आमिर खानच्या सिक्रेट सुपरस्टारने ७०० कोटीहून अधिक पैसा बॉक्स ऑफिसवर मिळवला आहे.

अक्षय कुमारच्या टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटाने देखील १०० कोटीहून अधिक कलेक्शन चीनमध्ये केले.

सलमान खानच्या बजंरगी भाईजान या चित्रपटाने ३०० कोटींचा गल्ला चीनमध्ये जमवला होता.