नाराजी दाखवायची झाली तर अमरावती, कोल्हापूर...; संजय राऊतांचा काँग्रेसला सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 03:11 PM2024-04-10T15:11:19+5:302024-04-10T15:13:05+5:30

उद्धव ठाकरेंबाबत जे घडलं त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती लोकांमध्ये आहे. त्याचा फायदा आमच्या मित्रपक्षांनी करून घ्यावा असं संजय राऊत यांनी सांगितले.

Sangli Lok Sabha Election - Disgruntled Congress workers should be convinced, Sanjay Raut warns Congress leaders | नाराजी दाखवायची झाली तर अमरावती, कोल्हापूर...; संजय राऊतांचा काँग्रेसला सूचक इशारा

नाराजी दाखवायची झाली तर अमरावती, कोल्हापूर...; संजय राऊतांचा काँग्रेसला सूचक इशारा

मुंबई - Sanjay Raut on Congress ( Marathi News ) जागावाटपात कुठलाही बदल होणार नाही, उमेदवार जाहीर झालेत. त्या त्या भागात उद्धव ठाकरे प्रचार सभा घेतायेत. फेऱ्या होतायेत, बैठका घेतल्या जातायेत. अशाप्रकारे नाराजी दाखवायची झाली तर आमचे लोकही अमरावती, कोल्हापूरलाही दाखवू शकतात. रामटेकला दाखवू शकतात असा सूचक इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे. सांगली इथं काँग्रेस नेते नाराज आहेत. त्यावरून राऊतांनी हे विधान केले. 

संजय राऊत म्हणाले की, जागावाटपात एखाद दुसऱ्या जागेवरून अडचणी येणार हे आम्ही गृहित धरलेच होते. त्यात सांगली, भिवंडीचा तिढा आहे. मुंबईतल्या जागेवरून वाद नाही. सांगली ही आम्ही घेतली. तिथं निवडणूक लढण्याची ताकद कमी आहे परंतु मतदार मशाल चिन्हावर मतदान करतील असं आमचं म्हणणं आहे. २०१४, २०१९ या दोन्ही निवडणुकीत सांगलीत काँग्रेस नव्हती. ती जागा मित्र पक्षाला सोडली होती. आमच्या कार्यकर्त्यांनी नाराजी दाखवली नाही कारण आम्ही त्यांना थांबवलं. आघाडीचा धर्म पाळला पाहिजे. काँग्रेस-राष्ट्रवादीचं काम आपण केले पाहिजे. भिवंडीत राष्ट्रवादी उमेदवाराचं काम आमचे लोक करतायेत. त्यामुळे काँग्रेसनं त्यांच्या नेत्यांना समजावलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या ३५ हून अधिक जागा निवडून येतील. आमच्या २१ पैकी १८ खासदार जिंकणार असं महाराष्ट्रातलं वातावरण आहे. महाविकास आघाडी ३५ हून अधिक जागा जिंकतील. देवेंद्र फडणवीस ४५ प्लस जागा म्हणतात, त्यांनाही प्रश्न विचारा. आम्ही ३५ हून अधिक जागा जिंकू असं सांगतोय. मेहनत करणाऱ्या पक्षाला आत्मविश्वास असायलाच हवा असं संजय राऊतांनी म्हटलं. 

उद्धव ठाकरेंबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती 
 
शिवसेना हा महाराष्ट्रातील प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे. प्रादेशिक पक्षाचं राजकारण या देशात राहणार, प्रादेशिक पक्षाचं बोट धरूनच राष्ट्रीय पक्षाला जावं लागणार आहे. शिवसेना सातत्याने लोकसभेची निवडणूक लढवतेय. २०१९ मध्ये १८ जागा निवडून आल्या. त्यातील १३ जण सोडून गेले. त्याचा अर्थ खासदार, आमदार सोडून गेले तरी पक्ष, कार्यकर्ता आमच्याकडेच आहे. उद्धव ठाकरेंबाबत जे घडलं त्यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती लोकांमध्ये आहे. त्याचा फायदा आमच्या मित्रपक्षांनी करून घ्यावा. विद्यमान जागेवर चर्चा करायची नाही असं आमचं ठरलं, काँग्रेसकडे १ जागा होती, राष्ट्रवादीकडे ४ जागा होत्या. आमच्याकडे १८ जागा होत्या त्यामुळे त्या जागांवर आमचा अधिकार होता असं संजय राऊतांनी स्पष्ट केले. 

शिंदेंची शिवसेना नकली, ठाकरेंची शिवसेना खरी

भाजपा युतीत शिवसेनेने २२ जागा लढवल्या होत्या, शिंदेंची शिवसेना खरी असती तर त्यांना २२-२३ जागा मिळाल्या असत्या. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना खरी आहे. त्यामुळे आमची ताकद जिथे आहे त्या जागा आम्ही महाविकास आघाडीत चर्चेतून घेतल्या आहेत. त्यामुळे २१ जागांवर आम्ही निवडणूक लढतोय असं संजय राऊतांनी सांगितले. 

Web Title: Sangli Lok Sabha Election - Disgruntled Congress workers should be convinced, Sanjay Raut warns Congress leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.