"काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके!"; भाजपा नेत्याचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:46 AM2024-04-11T11:46:48+5:302024-04-11T11:48:31+5:30

BJP Ashish Shelar Slams Congress Nana Patole : नानांच्या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

BJP Ashish Shelar Slams Congress Nana Patole Over his statement | "काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके!"; भाजपा नेत्याचा खोचक टोला

"काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके!"; भाजपा नेत्याचा खोचक टोला

लोकसभा निवडणुका सुरु होताच अनंतकुमार हेगडे या भाजपा नेत्याने ४०० पार चे बहुमत आले की, संविधान बदलणार हे जाहीरपणे सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागारानेही संविधान बदलले पाहिजे असे स्पष्ट केले आहे, असे असताना संविधानावरुन काँग्रेसवरच आरोप करणे हे पंतप्रधान मोदी व भाजपाला शोभत नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे. नानांच्या या टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

"काय झाडी... काय डोंगार... एकदम सगळं कसं ओके... काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके!" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "काय झाडी..! काय डोंगार...!! महायुतीमध्ये एकदम ओके..! आघाडीत एकमेकांना एकमेकांचेच धोके! वर्षानुवर्षे काँग्रेसला काँग्रेसनेच हरवलं, त्यातच आता उबाठा गटाला घ्यायचे ठरवलं. या गटाच्या मैत्रीला तर दुष्मनाची ही नाही येणार सर, ऐक काँग्रेस, आता तू कर्माने मर!"

"साहेबांच्या गटाची तर काय सांगावी ख्याती? गावभर भांडणं लागली की, साहेब म्हणणार आपली ताई आणि आपली बारामती!! काय झाडी... काय डोंगार... एकदम सगळं कसं ओके... काँग्रेसमध्ये चुकलेत आमच्या नानांचे ठोके!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. नाना पटोले यांनी देशात ४० वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी आहे, मोदी सरकारने नोकर भरती केली नाही तरुणांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही आणि १० वर्ष हा तर ट्रेलर आहे असे म्हणतात, पण हा ट्रेलरच जनतेला देशोधडीला लावणारा असेल तर जनता पुन्हा भाजपा व एनडीएला मते कशाला देईल. १० वर्षातील मोदी सरकारच्या पापाची शिक्षा जनता या लोकसभा निवडणुकीत देऊन त्यांना घरी बसवेल, असा दावा केल होता. त्यावर आता भाजपा नेत्याने पलटवार केला आहे. 
 

Web Title: BJP Ashish Shelar Slams Congress Nana Patole Over his statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.