कोण आहे ‘सोनू की टीटू’च्या कार्तिक आर्यनची ही सुंदर गर्लफ्रेन्ड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 18:30 IST2018-07-16T14:46:50+5:302018-07-16T18:30:00+5:30
‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘प्यार का पंचनाम’ यासारख्या चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये नावारूपास आलेला अभिनेता कार्तिक आर्यन प्रेमात पडलाय.

कोण आहे ‘सोनू की टीटू’च्या कार्तिक आर्यनची ही सुंदर गर्लफ्रेन्ड?
‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘प्यार का पंचनाम’ यासारख्या चित्रपटांमुळे बॉलिवूडमध्ये नावारूपास आलेला अभिनेता कार्तिक आर्यन प्रेमात पडलाय. अलीकडे अनेकदा त्याला त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत पाहिले गेले. अगदी अलीकडे मुंबईतील वांद्रे भागात तो पुन्हा एकदा त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत दिसला. आता कार्तिकच्या या गर्लफ्रेन्डबद्दल काही तर कळायलाचं हवे ना. तर तिचे नाव आहे डिंपल शर्मा.
कार्तिक सध्या डिंपलला डेट करतोय. डिंपल ही भारतीय वंशाची कॅनडियन मॉडेल आहे. सध्या मुंबईच्या मॉडेलिंग आणि जाहिरात विश्वास डिंपलचा बोलबाला आहे. काही दिवसांपूर्वी ती रणबीर कपूरसोबत एका जाहिरातीत दिसली होती. याच डिंपलच्या प्रेमात कार्तिक आकंठ बुडालायं.
खरे तर कार्तिक आर्यन व अभिनेत्री नुसरत भरूचा एकमेकांना डेट करत असल्याची खबर होती. पण ही खबर नुसतीच अफवा निघाली. कारण कार्तिक नुसरतला नाही तर डिंपलला डेट करतोय. अर्थात अद्याप त्याने ही गोष्ट अद्याप कबुल केलेली नाहीये.
डिंपल शर्मा सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह आहे. इन्स्टावर ती स्वत:चे रोज नवे फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.
डिंपल बॉलिवूडमध्ये येण्यासही उत्सूक असल्याचे कळतेय. यासाठी तिला एका मोठ्या ब्रेकची प्रतीक्षा आहे. आता हा ब्रेक तिला कसा मिळतो अन् कुणाच्या माध्यमातून मिळतो, ते बघूच.
‘सोनू के टीटू की स्वीटी’चित्रपटानंतर कार्तिक आर्यन प्रकाशझोतात आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मिळवलेले यश हे सगळ्यांसाठी सरप्राईज होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या चित्रपटाच्या यशनंतर कार्तिक आर्यनवर अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या नजरा गेल्या. त्याचा 'सोनू के टीटू की स्वीटी’मधील अभिनय अनेक जणांना भावला. काही महिन्यांपूर्वी कार्तिकने मनिष मल्होत्राच्या शोमध्ये करीना कपूरसोबत रॅम्पवॉक केला होता.