Kartik Aryan's wish was fulfilled, the actress will do it with the actress | कार्तिक आर्यनची ही इच्छा झाली पूर्ण, या अभिनेत्रीसोबत करणार काम

‘सोनू के टीटू की स्वीटी’चित्रपटानंतर कार्तिक आर्यन चांगलाच प्रकाशझोतात आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मिळवलेले यश हे सगळ्यांसाठी सरप्राईज होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या चित्रपटाच्या यशनंतर कार्तिक आर्यनवर अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या नजरा गेल्या. त्याचा 'सोनू के टीटू की स्वीटी’मधील अभिनय अनेक जणांना भावला. काही महिन्यांपूर्वी कार्तिकने मनिष मल्होत्राच्या शोमध्ये करीना कपूरसोबत रॅम्पवॉक केला होता. त्यावेळी त्यांने करीना कपूरसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता लवकरच कार्तिकची ही इच्छा पूर्ण होणार आहे. लवकरच कार्तिक आर्यन करिना कपूर आणि करण जोहरसोबत नव्या चित्रपटात दिसणार आहे. फक्त तो या चित्रपटात करीनाच्या अपोझिट दिसणार नाहीय. राज मेहता दिग्दर्शित या चित्रपटात दोन अभिनेते आणि दोन अभिनेत्री आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कार्तिकच्या अपोझिट जान्हवी कपूर किंवा क्रिती सॅननला कास्ट करण्यात येऊ शकतो. 

काही दिवसांपूर्वी कार्तिकने संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट देखील घेतली होती. सूत्रांचे मानाल तर ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटातील कार्तिकचे काम भन्साळींना प्रचंड आवडले आणि त्यांनी त्याला आपल्या नव्या चित्रपटाची आॅफर दिली. त्यामुळे सगळे काही जुळून आले तर भन्साळींच्या आगामी रोमॅन्टिक चित्रपटात कार्तिक दिसेल. कार्तिकने २०११ मध्ये आपली अभिनय कारकिर्द सुरु केली होती. ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला होता. यात त्याने रजत नामक व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात कार्तिकला सलग पाच मिनिटं न थांबता संवाद बोलायचा होता. हा संवाद हिंदी चित्रपटातील सर्वात लांब संवाद मानला जातो.

ALSO READ :  'सोनू की टीटू की स्वीटी' सुपरहिट झाल्यानंतर कार्तिक आर्यनने वाढवली फीस
Web Title: Kartik Aryan's wish was fulfilled, the actress will do it with the actress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.