Kartik Aryan will appear with 'Heroic' starring Prabhas. | ‘बाहुबली’स्टार प्रभासच्या हिरोईनसोबत दिसणार कार्तिक आर्यन!
‘बाहुबली’स्टार प्रभासच्या हिरोईनसोबत दिसणार कार्तिक आर्यन!
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचे नशीब सध्या जोरावर आहे, असे दिसतेय. ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या कार्तिकच्या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. कुणाच्या ध्यानी मनी नसताना या चित्रपटाने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली. यानंतर कार्तिक फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्राच्या कलेक्शनसाठी करिना कपूरसोबत रॅम्प वॉक करताना दिसला. आता एक नवी बातमी आहे. ती म्हणजे, कार्तिक आर्यन लवकरचं दिनेश विजनच्या पुढील चित्रपटात दिसणार आहे. तो सुद्धा ‘बाहुबली’स्टार प्रभासच्या हिरोईनसोबत. होय, प्रभासची हिरोईन श्रद्धा कपूरसोबत कार्तिक आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.ALSO READ : काय म्हणता, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ फेम कार्तिक आर्यनला भन्साळींची आॅफर??

निर्माता दिनेश विजनने गतवर्षी ‘राब्ता’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले होते. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत आणि क्रिती सॅनॉन मुख्य भूमिकेत होते. आता दिनेश कार्तिक व श्रद्धा या फ्रेश जोडीसोबत नवा चित्रपट घेऊन येत आहे. मराठी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. उतेकर यापूर्वी ‘१०२ नॉट आऊट’, ‘हिंदी मीडियम’ आणि ‘डियर जिंदगी’ या चित्रपटांचे सिनेमॅट्रोग्राफर राहिले आहेत.
कार्तिकला साईन केल्यानंतर दिनेश यांना या चित्रपटासाठी लीडिंग लेडीचा शोध होता. त्याचा हा शोध श्रद्धा कपूरजवळ येऊन थांबला. दिनेशने श्रद्धासोबत ‘स्त्री’मध्ये याआधीही काम केले आहे. पुढील वर्षी हा चित्रपट फ्लोरवर येण्याची शक्यता येणार आहे. तूर्तास श्रद्धा प्रभाससोबत ‘साहो’ आणि शाहिद कपूरसोबत ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटांत बिझी आहे.
कार्तिकने २०११ मध्ये आपली अभिनय कारकिर्द सुरु केली होती. ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला होता. यात त्याने रजत नामक व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात कार्तिकला सलग पाच मिनिटं न थांबता संवाद बोलायचा होता. हा संवाद हिंदी चित्रपटातील सर्वात लांब संवाद मानला जातो.
Web Title: Kartik Aryan will appear with 'Heroic' starring Prabhas.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.