खळबळजनक.. भाजप कार्यालयातच महिलेचा विनयभंग? Crime In BJP Corporator's Office | Borivali
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 15:05 IST2021-09-23T15:05:05+5:302021-09-23T15:05:40+5:30
महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर एकीकडे भाजप राज्यात आक्रमक पाहायला मिळेतय.. चित्रा वाघ आणि भाजपच्या महिला नेत्या या महिला सुरक्षेच्या मुद्दयांवरून सरकारला घेरतायत.. दुसरीकडे राज्यपालही महिला सुरक्षेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याची मागणी करतायत.. पण भाजपच्या याच प्रयत्नांना धक्का देणारी एक घटना आता मुंबईतून समोर आलेय... मुंबईतील भाजप महिला नगरसेविकेच्या संपर्क कार्यालयामध्ये पार्टीच्या कार्यकर्त्याने एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर येतंय.