वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी बजावला मतदानाचा हक्क

By संतोष वानखडे | Updated: April 26, 2024 09:52 IST2024-04-26T09:51:33+5:302024-04-26T09:52:14+5:30

Lok Sabha Election 2024 : या ठिकाणी करण्यात आलेली सजावट आणि स्वच्छतेबाबत जिल्हाधिकारी यांनी बूथ ऑफिसर यांचे कौतुक केले. 

Washim Collector Buvaneshwari S exercised the right to vote | वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी बजावला मतदानाचा हक्क

वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी बजावला मतदानाचा हक्क

वाशिम : वाशिम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी २६ एप्रिल रोजी सिविल लाईन्स येथील लॉयन्स विद्या निकेतन शाळा या मतदान केंद्र क्रमांक २२६ येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी करण्यात आलेली सजावट आणि स्वच्छतेबाबत जिल्हाधिकारी यांनी बूथ ऑफिसर यांचे कौतुक केले. 

सर्व मतदारांनी आपल्या अधिकाराचे वापर करून अवश्य मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. यावेळी बुवनेश्वरी यांनी बोलका रोबोट , मी मतदान केल्याचे सेल्फी पॉइंट येथे सेल्फी घेऊन एनसीसी व स्काऊटच्या विद्यार्थिनीसोबत संवाद साधला व त्यांच्यासोबतही सेल्फी काढली. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.

Web Title: Washim Collector Buvaneshwari S exercised the right to vote