मतदारांची दिशाभुल करणारा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल, सहा लोकांवर गुन्हे दाखल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 15:54 IST2019-10-21T15:54:24+5:302019-10-21T15:54:28+5:30
सहा लोकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मतदारांची दिशाभुल करणारा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल, सहा लोकांवर गुन्हे दाखल !
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम) : रिसोड विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने शिवसेनच्या उमेदवाराला पांठीबा
दिल्याचा खोटा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी २१ ऑक्टोबर रोजी सहा लोकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर असे की वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष प्रदिप खंडारे यांनी रिसोड पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमुद केले की रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडुन दिलीपराव जाधव हे निवडणुक लढवित आहेत. जाधव यांचे राजकीय विरोधक सोशल मिडीयावर दिशाभुल करणारे मॅसेज पाठवीत आहेत. सदर प्रकार हा शनिवार १९ ऑक्टोबरच्या रात्री पासुन सुरु आहे. सोशल मिडीयावर ०हायरल केलेल्या मॅसेजमध्ये मी वंचीत बहुजन आघाडीचा उमेदवार दिलीपराव जाधव ओबीसी, दलीत,वंचित सर्व समाजाचा विचार करून मी शिवसेना,भाजपा महायुतीचे उमेदवार विश्वनाथ आश्रृजी सानप यांना जाहीर पांठीबा देत आहे. त्यांच्या धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबुन आपले अमुल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजयी करा अशी खोटी पोस्ट दिलीप जाधव यांचे नाव टाकून सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. काही ग्रुपवर ही पोस्ट आल्याने सदर बाब ही तक्रारदाराच्या आजरोजी निर्दशनास आल्याने ग्रुपमध्ये पोस्ट टाकणारे सुनिल नागरे, अक्षय सानप, आकाश शिंदे, मंथन बंड, संतोष व नाव माहीत नसलेल्या या ७७४४९६८८९४ क्रंमाकाच्या मालका विरोधात तक्रार देण्यात आली. खंडारे यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६०, लोकप्रतिनिधित्व १९५१ आणि १९८८, माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार कलम १७१- जी, १२३(४),६६ ड नुसार गुन्हे दाखल केले आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.