Maharashtra Loksabha election voting live : आधी मतदान केले, मग लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 16:03 IST2019-04-11T16:01:25+5:302019-04-11T16:03:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : कारंजा तालुक्यातील म्हसला येथील चेतन रामेश्वर घोडसाड यांचे ११ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता ...

Maharashtra Loksabha election voting live : आधी मतदान केले, मग लग्न
ल ोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कारंजा तालुक्यातील म्हसला येथील चेतन रामेश्वर घोडसाड यांचे ११ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता कामरगाव येथील युवतीसोबत लग्न असल्याने ते सकाळी वरातीसह कामरगावकडे लग्नासाठी निघाले. मात्र, बोहल्यावर चढण्यापूर्वी त्यांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजाविले. म्हसला येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा या मतदान केंद्रावर त्यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. मुंडावळ््या बांधून झाल्यावर त्यांची वरात देवळात न जाता आधी मतदान केंद्रावर आली आहे. येथे मतदान करून ते पुढील कर्तव्यासाठी निघाले.दरम्यान, जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर सुरळीत मतदान सुरु आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील कारंजा-मानोरा व वाशिम-मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ३६ .०३ टक्के मतदान झाले.भावना गवळी यांनी केले मतदानवाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार भावना गवळी यांनी वाशिम शहरातील राजेंद्र प्रसाद विद्यामंदिर येथे दुपारच्या सुमारास आपला मतदानाचा हक्क बजावला. वाशिम शहरामध्ये उन्हाचा पारा वाढला असतांना दुपारच्यावेळी मतदान केंद्रावर मोठया प्रमाणात गर्दी दिसून आली. दुपारी २ वाजताच्या सुमारास भावना गवळी सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या राजेंद्रप्रसाद विद्यामंदिरामध्ये येवून आपल्या मतदानाचा हक्क बजाविला.