पत्नीची हत्या करणार्या आरोपी पतीला राजस्थानमधून अटक; धावत्या रेल्वेतून केलं जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 20:01 IST2023-02-14T20:00:37+5:302023-02-14T20:01:12+5:30
पत्नीची हत्या करणार्या आरोपी पतीला राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे.

पत्नीची हत्या करणार्या आरोपी पतीला राजस्थानमधून अटक; धावत्या रेल्वेतून केलं जेरबंद
(मंगेश कराळे)
नालासोपारा : तुळींज येथील ४० वर्षीय पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपी पतीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी जीआरपीच्या मदतीने दिल्लीला पळून जाणाऱ्या आरोपीला नागदा रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले आहे. हार्दीक शहा असे या आरोपी पतीचे नाव आहे. ही हत्या नेमकी का व कोणत्या कारणामुळे झाली याचा पोलीस आता पुढील तपास करत आहे.
तुळींज येथील सोमवारी संध्याकाळी सीता सदन या इमारतीत मेघा शहा (४०) या महिलेचा तीन ते चार दिवसांपूर्वी हत्या करून बेडमध्ये ठेवलेला कुजलेला मृतदेह आढळला होता. तिचा पती फरार असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय होता. हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी टीममधील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आरोपीला पकडण्याच्या सूचना दिल्या.
आरोपी पती दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने जीआरपीच्या मदतीने धावत्या ट्रेनमधून ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पती व पत्नी लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत होते. दोघांमध्ये पैश्यावरून नेहमी वाद होऊन भांडण होत असल्याने शेवटी पतीने तिचा टॉव्हेलने गळा आवळून हत्या केली आहे.