ठाकरे बंधूंबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मनसेकडून तरुणाला चोप, अर्धनग्न करून काढली धिंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 09:47 IST2026-01-30T09:44:23+5:302026-01-30T09:47:31+5:30

Nala Sopara: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्यांना मनसैनिकांनी सणसणीत चपराक लगावली आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्या सूरज शिर्के या तरुणाला नालासोपाऱ्यात चांगलाच धडा शिकवण्यात आला.

Abusing Thackeray Brothers for Views Costs Dearly; MNS Workers Parade Youth in Nalasopara | ठाकरे बंधूंबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मनसेकडून तरुणाला चोप, अर्धनग्न करून काढली धिंड!

ठाकरे बंधूंबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मनसेकडून तरुणाला चोप, अर्धनग्न करून काढली धिंड!

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि 'व्ह्यूज'च्या हव्यासापोटी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अर्वाच्च भाषेत टीका करणाऱ्या एका तरुणाला महाराष्ट्र सैनिकांनी 'मनसे स्टाईल'ने धडा शिकवला आहे. नालासोपाऱ्यातील या तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला असून, त्याची अर्धनग्न अवस्थेत सुमारे दीड किलोमीटरपर्यंत धिंड काढली. या घटनेमुळे सोशल मीडियावर कुणाबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना एक मोठा इशारा मिळाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सूरज शिर्के, असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केवळ अधिक व्ह्यूज मिळवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केली होती. तरुणाच्या या कृत्यामुळे राजकीय वर्तुळात आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

प्रसिद्धीसाठी सातत्याने ही मर्यादा ओलांडली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर, मनसे पदाधिकारी किरण नकाशे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या तरुणाचा शोध घेतला. संतापलेल्या मनसैनिकांनी त्याला गाठून चांगलाच चोप दिला. एवढ्यावरच न थांबता, त्याची अर्धनग्न अवस्थेत एक ते दीड किलोमीटरपर्यंत धिंड काढली. या कारवाईनंतर घाबरलेल्या सूरज शिर्केने हात जोडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागितली.

या घटनेबाबत मनसेच्या अधिकृत एक्स हँडलवरून पोस्ट करण्यात आली.  "सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी हा तरुण अर्वाच्च भाषेत टीका आणि शिवीगाळ करत होता. एका मर्यादेपर्यंत टीका सहन केली जाऊ शकते, परंतु प्रसिद्धीसाठी सातत्याने खालच्या पातळीवर जाऊन विधाने करणाऱ्या या तरुणाची महाराष्ट्र सैनिकांनी 'धिंड' काढली," असे मनसेने आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे.

Web Title : ठाकरे बंधुओं पर आपत्तिजनक पोस्ट, मनसे कार्यकर्ताओं ने युवक को पीटा।

Web Summary : नालासोपारा में मनसे कार्यकर्ताओं ने सूरज शिर्के नामक युवक को राज और उद्धव ठाकरे के खिलाफ आपत्तिजनक सोशल मीडिया पोस्ट के लिए पीटा और उसे अर्धनग्न घुमाया। बाद में शिर्के ने माफी मांगी।

Web Title : MNS activists thrash youth for offensive posts about Thackeray brothers.

Web Summary : MNS workers in Nalasopara thrashed a youth, Sooraj Shirke, and paraded him semi-naked for offensive social media posts against Raj and Uddhav Thackeray. Shirke later apologized.