शेतातील विद्युत मीटरच्या पेटीला करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 20:15 IST2022-07-16T20:14:57+5:302022-07-16T20:15:26+5:30
केळापूर येथील शेतकरी विजय किसन कांबळे (५७ ) हे नेहमी प्रमाणे शेतात गेले असता त्यांना विद्युत मीटरच्या पेटीतून येणारे मोटरचे वायर पडून दिसले.

शेतातील विद्युत मीटरच्या पेटीला करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू
विनोद घोडे
चिकणी जामणी (वर्धा) : नजीकच्या केळापूर येथील शेतकऱ्याचा विद्युत मीटरच्या पेटीचा करंट लागल्याने मृत्यू झाला, ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान मौजा केळापूर शिवारात घडली.
केळापूर येथील शेतकरी विजय किसन कांबळे (५७ ) हे नेहमी प्रमाणे शेतात गेले असता त्यांना विद्युत मीटरच्या पेटीतून येणारे मोटरचे वायर पडून दिसले. त्यांनी हे वायर उचलून ठेवत असतांनाच जबरदस्त विद्युत शॉक लागला व खाली कोसळले असता त्यांच्या पत्नीचे लक्ष गेले व त्यांनी आरडाओरडा केली, व गावकऱ्यांच्या मदतीने सावंगी रुग्णालयात उपचारासाठी नेले,पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले,त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुली,जावई, नातवंडे असा बराच मोठा परिवार आहे, त्यांच्या अचानक जाण्याने गावावर शोककळा पसरली,सावंगी पोलिसांनी मृत्यूची नोंद घेतली.