वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 15:14 IST2025-10-03T15:12:39+5:302025-10-03T15:14:46+5:30
उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातील मौरानीपूर परिसरातून एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली.

वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
उत्तर प्रदेशातीलझांसी जिल्ह्यातील मौरानीपूर परिसरातून एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली. दोन नातवंडांची आजी एका तरुणासोबत पळून गेली. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, पळून जाताना या महिलेने घरातून सुनेचे दागिने आणि सुमारे ४०,००० रुपये रोख रक्कम चोरून नेले. या घटनेमुळे महिलेच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
संबंधित महिलेचा पती कामता प्रसाद सायवारी गावात राहतो. कामता प्रसाद यांनी पोलिसांना सांगितले की, सुमारे अडीच वर्षांपूर्वी तो पत्नीला भिंड-मोरेना परिसरातील एका वीटभट्टीवर कामाला घेऊन आला. तिथे त्याची पत्नी आणि अमर सिंग प्रजापती याच्याशी ओळख झाली. या भेटीनंतर त्यांचे संबंध हळूहळू अनैतिक प्रेमसंबंधात रूपांतरित झाले.
'अशी' झाली प्रेमाची सुरुवात
कामता प्रसाद यांनी पत्नीच्या फोनवर अमर सिंगचा नंबर अनेकदा पाहिला आणि त्यांच्यातील संभाषणही ऐकले. सुनेलाही तिच्या सासूच्या वागण्यावर संशय आला होता. पतीने अनेकवेळा समजावण्याचा प्रयत्न करूनही या महिलेने अमरसोबतचे अनैतिक प्रेमसंबंध सुरू ठेवले.
सुनांचे दागिने प्रियकरासोबत फरार
काही दिवसांपूर्वी कामता प्रसाद आपल्या मुलाच्या उपचारासाठी झांसी येथे गेला होता. पती घराबाहेर असल्याची संधी साधून महिलेने घरातून ४० हजार रुपये रोख रक्कम आणि सुनांचे दागिने चोरले. त्यानंतर ती तिचा प्रियकर अमर सिंग याच्यासह पळून गेली. या बातमीने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ज्या सुनांचे दागिने गेले, त्या मानसिक धक्क्यात आहेत, तर नातवंडांना आजी अचानक गायब झाल्याचे कोडं अजून समजलेलं नाही.
पोलिसांचा तपास सुरू
पीडित पती कामता प्रसाद यांनी कुटुंबासह मौरानीपूर पोलिस ठाणे गाठले. त्यांनी पत्नी आणि तिचा प्रियकर अमर सिंग यांच्याविरुद्ध चोरी करून पळून गेल्याची तक्रार दाखल केली. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालत, दोघांनाही लवकरात लवकर शोधून काढण्याची मागणी केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.