ठाण्यात तलावपाळीवर मतदान जनजागृती मोहीम

By सुरेश लोखंडे | Updated: April 16, 2024 17:20 IST2024-04-16T17:19:08+5:302024-04-16T17:20:21+5:30

या जनजागृती मोहिमेस नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

vote awareness campaign in thane for lok sabha election 2024 | ठाण्यात तलावपाळीवर मतदान जनजागृती मोहीम

ठाण्यात तलावपाळीवर मतदान जनजागृती मोहीम

लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाण्यातील तलावपाळी येथे फेरफटका मारण्यास येणाऱ्या ठाणेकरांमध्ये स्वीप पथकाने मतदानाविषयी जनजागृती केली. या जनजागृती मोहिमेस नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व जास्तीत जास्त मतदान टक्का वाढला पाहिजे, या उद्देश्याने ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप पथकाने तलावपाळी येथे मतदान जनजागृतीचे फलक घेऊन मतदारांना मतदानाचे महत्व पटवून दिले. हा मतदान जनजागृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या नेतृत्वाखाली स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांनी घेतला.

Web Title: vote awareness campaign in thane for lok sabha election 2024