भिवंडीत सेवानिवृत्त वृद्ध शिक्षक मतदानापासून वंचित
By नितीन पंडित | Updated: May 20, 2024 17:38 IST2024-05-20T17:36:38+5:302024-05-20T17:38:10+5:30
मोतीराम जाणू जाधव असे मतदानापासून वंचित राहिलेल्या ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षकांचे नाव आहे.

भिवंडीत सेवानिवृत्त वृद्ध शिक्षक मतदानापासून वंचित
भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये असलेल्या भिवंडी पूर्व पश्चिम ग्रामीण शहापूर मुरबाड व कल्याण पश्चिम या सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार याद्यांमध्ये मतदानाच्या दिवशी घोळ दिसला. भिवंडीतील ग्रामीण मतदार संघात येत असलेल्या वडघर येथे ८३ वर्षाचे सेवानिवृत्त वृद्ध शिक्षकांचे नाव मतदार यादीतून गहाळ करण्यात आले आहे. मतदार यादीतून नाव गहाळ झाल्यामुळे सेवानिवृत्त वृद्ध शिक्षकांना लोकसभा निवडणुकीच्या मतदानापासून वंचित राहावे लागले आहे.
मोतीराम जाणू जाधव असे मतदानापासून वंचित राहिलेल्या ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षकांचे नाव असून मतदार यादीत त्यांचे नाव गहाळ झाल्याने आज ते मतदानापासून वंचित राहिले आहेत. प्रशासकीय यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे आज मला मतदानाचा हक्क बजावता आला नाही, मतदार यादीतून अचानक माझे नाव कसे गायब झाले याची चौकशी होऊन यात दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सेवानिवृत्त वृद्ध शिक्षक मोतीराम जाधव यांनी केली आहे.