मीरा भाईंदर मधील माजी नगरसेवकांच्या संपत्तीची उत्तुंग भरारी ; सर्वात जास्त पालिकेतील सत्तेचे लाभार्थी ठरले भाजपाचे माजी नगरसेवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:06 IST2026-01-13T17:05:31+5:302026-01-13T17:06:33+5:30

गेल्या ८ वर्षात अनेकांची संपत्ती दुपटी पासून ५ पटीने वाढली आहे.

Mira Bhayander Municipal Election 2026 wealth of former corporators in Mira Bhayandar has skyrocketed; Former BJP corporators have become the biggest beneficiaries of power in the municipality | मीरा भाईंदर मधील माजी नगरसेवकांच्या संपत्तीची उत्तुंग भरारी ; सर्वात जास्त पालिकेतील सत्तेचे लाभार्थी ठरले भाजपाचे माजी नगरसेवक

मीरा भाईंदर मधील माजी नगरसेवकांच्या संपत्तीची उत्तुंग भरारी ; सर्वात जास्त पालिकेतील सत्तेचे लाभार्थी ठरले भाजपाचे माजी नगरसेवक

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेत २०१७ साली निवडून आलेल्या आणि पुन्हा निवडणूक रिंगणात असलेल्या अनेक माजी नगरसेवकांच्या संपत्तीने उत्तुंग अशी भरारी घेतली आहे. गेल्या ८ वर्षात अनेकांची संपत्ती दुपटी पासून ५ पटीने वाढली आहे. अनेकांची मालमत्ता नगरसेवक झाल्यावर फोफावल्याने स्वतःची व निकटवर्तीयांची घरे भरल्याच्या आरोपांना बळ मिळाले आहे.

अनेक माजी नगरसेवक उमेदवारांनी त्यांची मालमत्ता मुलांच्या नावे केली आहे. तर अनेकांनी त्यांच्या निकटवर्तीयांच्या नावे फिरवल्याची देखील चर्चा आहे. वार्षिक उत्पन्न काही लाखात मात्र संपत्ती करोडोंची आहे. कोणी नोकरी तर कोणी व्यवसाय उत्पन्नाचे साधन दाखवले आहे.  आगरी समाजातील काहींच्या मालमत्ता ह्या वारसा हक्काने जमिनी मिळाल्याने तसेच मालमत्ता - जमिनींचे भाव वाढल्याने वाढलेल्या दिसतात. त्यातही भाजपाच्या माजी नगरसेवकांच्या मालमत्ता दुपटी पेक्षा जास्त वाढल्याने महापालिकेतील २०१७ पासूनची सत्ता त्यांना चांगलीच फळली असल्याचे दिसून येते. 

निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार भाईंदर पूर्वेच्या प्रभाग ४ मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धनेश परशुराम पाटील यांची १४३ कोटी ९५ लाखांची संपत्ती आहे. त्यापैकी तब्बल १४० कोटी ४९ लाख रुपयांची जमीन, सदनिका आदी स्थावर मालमत्ता आहे. मागील निवडणुकीत ३१ कोटी १८ लाखांची संपत्ती दर्शवली होती. त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. प्रभाग १२ मधील भाजपचे माजी उपमहापौर हसमुख गेहलोत यांची  मागील निवडणुकीत असलेली ४ कोटी ५५ लाख रुपयांची संपत्ती तब्बल १४ कोटी पर्यंत वाढली आहे. त्यामुळे भाजपाचे प्रभाग ८ मधील सुरेश खंडेलवाल यांची २०१७ मध्ये असलेली ५ कोटी ५७ लाख रुपयांची संपत्ती २५ कोटी ३३ लाख वर पोहचली आहे. भाजपचे ध्रुवकिशोर पाटील यांची संपत्ती ९८ लाखांवरून १ कोटी ८८ लाख झाली आहे. ध्रुवकिशोर राहतात तो आलिशान मोठा फ्लॅट मात्र त्यांच्या भावाच्या नावे आहे.  पाटील यांच्या निकटवर्तीय भाजपा उमेदवार ऍड. श्रद्धा कदम यांची संपत्ती तब्बल ५ कोटी ६ लाख आहे. 

माजी नगरसेवक सचिन म्हात्रे यांच्या पत्नी मयुरी यांनी २ कोटी ७ लाख मालमत्ता दाखवली आहे. सचिन यांनी गेल्यावेळी ७४ लाख २५ हजार मालमत्ता दाखवली होती. प्रभाग २३ मधील लाचखोरी - भ्रष्टाचारच्या गुन्ह्यात ५ वर्षांचा कारावास आणि ५ लाखांच्या दंडची शिक्षा झालेल्या भाजपा उमेदवार वर्षा भानुशाली यांची १ कोटी १० लाखांची संपत्ती यंदा ३ कोटी १९ लाखांवर गेली आहे. अनधिकृत बांधकाम प्रकरणी लाच घेताना पकडलेले प्रभाग १ मधील भाजपाचे अशोक तिवारी यांची संपत्ती १ कोटी ८१ लाखांवरून तब्बल ६ कोटी ८७ लाख झाली आहे. 

भाजपाचे माजी नगरसेवक उमेदवार - 

प्रभागनाव२०१७ ची मालमत्ता२०२६ ची मालमत्ता
प्रभाग 12माजी महापौर डिम्पल मेहता26 कोटी 78 लाख30 कोटी 68 लाख
प्रभाग 7ऍड. रवी व्यास5 कोटी 15 लाख10 कोटी 70 लाख
प्रभाग 2शानू गोहिल97 लाख3 कोटी 39 लाख
 मदन सिंह1 कोटी 2 लाख2 कोटी 61 लाख
प्रभाग 3गणेश शेट्टी4 कोटी 1 लाख9 कोटी 77 लाख
प्रभाग 5मुन्ना सिंह43 लाख1 कोटी 3 लाख
 वंदना मंगेश पाटील12 कोटी 11 लाख13 कोटी 52 लाख
प्रभाग 6सुनीता जैन1 कोटी 45 लाख3 कोटी 1 लाख
प्रभाग 14माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे4 कोटी 79 लाख6 कोटी 84 लाख
 मीरादेवी यादव1 कोटी 60 लाख3 कोटी 64 लाख
प्रभाग 15मोहन म्हात्रे1 कोटी 70 लाख3 कोटी 28 लाख
 सुरेखा सोनार2 कोटी 71 लाख3 कोटी 64 लाख
प्रभाग 16वंदना भावसार58 लाख2 कोटी 2 लाख
प्रभाग 17प्रशांत दळवी1 कोटी 79 लाख3 कोटी 71 लाख
 दीपिका अरोरा1 कोटी 59 लाख2 कोटी 42 लाख
 हेमा बेलानी6 कोटी 15 लाख9 कोटी 10 लाख
प्रभाग 18नीला सोन्स5 कोटी 62 लाख11 कोटी 28 लाख
प्रभाग 20दिनेश जैन2 कोटी 2 लाख5 कोटी 5 लाख
 हेतल परमार35 लाख1 कोटी 17 लाख
प्रभाग 21मनोज दुबे2 कोटी 91 लाख6 कोटी 65 लाख
 अनिल विराणी3 कोटी 20 लाख4 कोटी 6 लाख
प्रभाग 23जयेश भोईर1 कोटी 12 लाख2 कोटी 28 लाख

भाजपाचे माजी नगरसेवक (बंडखोर)

प्रभागनाव२०१७ ची मालमत्ता२०२६ ची मालमत्ता
प्रभाग 1रिटा शाह3 कोटी 37 लाख5 कोटी 38 लाख
प्रभाग 4गणेश भोईर1 कोटी 56 लाख2 कोटी 3 लाख
 प्रभात पाटील3 कोटी 65 लाख5 कोटी 99 लाख
प्रभाग 5डॉ. प्रीती पाटील34 कोटी 71 लाख43 कोटी 54 लाख
 सुनीता भोईर61 लाख7 कोटी 7 लाख
प्रभाग 9नरेश पाटील55 लाख1 कोटी 54 लाख

शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक उमेदवार

प्रभागनाव२०१७ ची मालमत्ता२०२६ ची मालमत्ता
प्रभाग 8माजी महापौर कॅटलीन परेरा6 कोटी 75 लाख14 कोटी 63 लाख
प्रभाग 10तारा विनायक घरत1 कोटी 87 लाख5 कोटी 53 लाख
प्रभाग 11वंदना आणि विकास पाटील6 कोटी 31 लाख11 कोटी 81 लाख
प्रभाग 15कमलेश भोईर78 लाख1 कोटी 29 लाख
प्रभाग 16भावना व राजू भोईर11 कोटी13 कोटी 30 लाख

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रभाग ३ मधील उमेदवार नीलम ढवण यांची मालमत्ता देखील १ कोटी ९० लाखांवरून ४ कोटी ६३ लाख रुपये झाली आहे.

Web Title : मीरा भायंदर: पूर्व पार्षदों की संपत्ति में उछाल; भाजपा को सत्ता से लाभ

Web Summary : मीरा भायंदर के पूर्व पार्षदों की संपत्ति में भारी वृद्धि देखी गई। कई ने आठ वर्षों में अपनी संपत्ति दोगुनी या पांच गुना कर ली, जिससे भ्रष्टाचार के आरोप लगे। भाजपा पार्षदों को उनके कार्यकाल के दौरान सबसे अधिक लाभ हुआ, उनकी संपत्ति में काफी वृद्धि हुई। कुछ ने संपत्ति परिवार के सदस्यों को हस्तांतरित कर दी।

Web Title : Mira Bhayandar Ex-Corporators' Assets Soar; BJP Benefited Most from Power

Web Summary : Ex-corporators in Mira Bhayandar saw significant asset growth. Many doubled or quintupled their wealth in eight years, fueling corruption allegations. BJP corporators benefited most during their term, with assets increasing substantially. Some transferred assets to family members.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.