ठाण्यात एका खुर्चीचे अनेक दावेदार! १७ जागांवर होणार 'बिग फाइट', राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याने रंगत; मनसेच्या उमेदवारांचं काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 12:16 IST2026-01-08T12:14:44+5:302026-01-08T12:16:11+5:30

ठाणे महापालिकेच्या निवडणूक रिंगणात ६४९ उमेदवार असले, तरी १७ ठिकाणी बिग फाइट होणार आहे. यात काँग्रेस आणि मनसेच्या शहराध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे...

Many contenders for one seat in Thane Big fight to be held on 17 seats NCP is facing two factions; What will happen to MNS candidates | ठाण्यात एका खुर्चीचे अनेक दावेदार! १७ जागांवर होणार 'बिग फाइट', राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याने रंगत; मनसेच्या उमेदवारांचं काय होणार?

ठाण्यात एका खुर्चीचे अनेक दावेदार! १७ जागांवर होणार 'बिग फाइट', राष्ट्रवादीचे दोन गट झाल्याने रंगत; मनसेच्या उमेदवारांचं काय होणार?

ठाणे महापालिकेच्या निवडणूक रिंगणात ६४९ उमेदवार असले, तरी १७ ठिकाणी बिग फाइट होणार आहे. यात काँग्रेस आणि मनसेच्या शहराध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एका पक्षाचे दोन गट झाल्याने काही ठिकाणी दोन माजी नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्या प्रभागात बाप आणि मुलीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

प्रभाग क्रमांक १ मध्ये शिंदेसेनेनी नम्रता घरत यांना उमेदवारी दिली. परंतु, आपल्याला तिकीट न मिळाल्याने रवी घरत यांनी शिंदेसेनेचे माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांच्या समोर उमेदवारी दाखल केली. प्रभाग क्रमांक दोनमध्ये सलग तीन वेळा निवडून येणारे भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांची लढत मनसेचेठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्याशी आहे. प्रभाग क्रमांक तीनमध्ये पक्ष विरोधी कारवाई केल्याने निलंबनाची कारवाई केलेल्या विक्रांत वायचळ यांना शिंदेसेनेने तिकीट देऊन बक्षिस दिले. परंतु, तेथे माजी नगरसेवक दर्शन भोईर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

कोपरीत शिंदेसेनेच्या नम्रता पमनानी आणि मनसेच्या राजेश्री नाईक, २१ मध्ये सुनेश जोशी (भाजप) विरुद्ध शिंदेसेनेचे बंडखोर किरण नाकती, काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची लढ भाजपचे वैभव कदम यांच्याशी होत आहे. प्रभाग क्रमांक २९ मध्ये बाबाजी पाटील (शिंदेसेना) विरुद्ध हिरा पाटील राष्ट्रवादी (शरद पवार), अनिता किणे राष्ट्रवादी राष्ट्रवादी (शरद पवार), मुंब्यात अशरफ पठाण राष्ट्रवादी (शरद पवार) विरुद्ध तौहीद मोहम्मद शेख राष्ट्र‌वादी (अजित पवार) अशरफ पठाण यांची कन्या मरझिया पठाण हिची लढत माजी नगरसेविका अशरीन राऊत राष्ट्रवादी (अजित पवार), प्रभाग क्र. ३२ मध्ये इनायक बेग मिर्झा राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध शाबीर शेख राष्ट्रवादी (शरद पवार), दिव्यात रमाकांत मढवी (शिंदेसेना) विरुद्ध रोहीदास मुंडे (उद्धवसेना), मढवी यांची कन्या साक्षी मढवी विरुद्ध अंकिता कदम (मनसे) यांच्याशी होत आहे. राबोडीत राष्ट्रवादी (अजित पवार) चे नजीब मुल्ला यांच्याविरोधात राष्ट्रवादी (शरद पवार) चे मोहम्मद असिम जावेद शेख आहेत.

माजी नगरसेविका प्रमिला केणी यांचीही बंडखोरी -
३१ मध्ये राजन किणे राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध महेंद्र कोमुर्लेकर राष्ट्रवादी (शरद पवार), ड मध्ये सुधीर भगत राष्ट्रवादी (शरद पवार) विरुद्ध मोरेश्वर किणे राष्ट्रवादी (अजित पवार), कळव्यात मिलिंद पाटील (शिंदेसेना) विरुध्द प्रकाश पाटील राष्ट्रवादी (शरद पवार), मिलिंद यांची पत्नी मनाली पाटील (शिंदेसेना) यांची लढत शिंदेसेनेच्या बंडखोर प्रमिला केणी यांच्याशी होत आहे. खारेगावमध्ये शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उमेश पाटील यांची लढत अभिजीत पवार राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्याशी होत आहे.

माजी नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकले
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत १२२ जागांपैकी २० जागांवर भाजप आणि शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने बिग फाइटची संख्या कमी झाली असली तरी काही प्रभागांत बिग फाइट होणारच आहे. त्याठिकाणी मातब्बर नगरसेवकांचे भवितव्य पणाला लागले आहे. काही माजी नगरसेवक हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. काही उमेदवारांना तिकीट नाकारल्याने त्यांनी थेट आपल्याच पक्षातील उमेदवाराला अपक्ष उभे राहून आव्हान दिले. त्यामुळे या लढती महत्त्वाच्या मानल्या जाणार आहेत.

Web Title: Many contenders for one seat in Thane Big fight to be held on 17 seats NCP is facing two factions; What will happen to MNS candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.