ठाण्यात कल्याणचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क

By जितेंद्र कालेकर | Updated: May 20, 2024 11:23 IST2024-05-20T11:23:02+5:302024-05-20T11:23:45+5:30

किसन नगर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. 

Mahayuti candidate for Kalyan in Thane Shrikant Shinde exercised his right to vote | ठाण्यात कल्याणचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क

ठाण्यात कल्याणचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क

ठाणे - कल्याण डोंबिवलीचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना आज आई  लता शिंदे आणि पत्नी  वृषाली शिंदे यांनी ओवाळून शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी किसन नगर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. 

गेल्या १० वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला विकास आणि दोन वर्षात महायुतीच्या सरकारने केलेले काम याच्या बळावर मुंबईसह एमएमआर मधील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील. येत्या ४ जून रोजी विरोधकांची तोंडे पूर्णपणे बंद होतील असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  यावेळी व्यक्त केला.

Web Title: Mahayuti candidate for Kalyan in Thane Shrikant Shinde exercised his right to vote