श्रीकांत शिंदे यांच्या आई प्रचारासाठी कलानी महलात
By सदानंद नाईक | Updated: May 12, 2024 16:40 IST2024-05-12T16:37:56+5:302024-05-12T16:40:14+5:30
Maharashtra lok sabha election 2024 : महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आई लता एकनाथ शिंदे निवडणूक मैदानात उतरल्या आहेत.

श्रीकांत शिंदे यांच्या आई प्रचारासाठी कलानी महलात
उल्हासनगर : महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आई लता एकनाथ शिंदे निवडणूक मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी माजी आमदार पप्पु कलानी यांच्या कलानी महल या घरी भेट देऊन पप्पु कलानी यांच्यासह ओमी कलानी, पंचम कलानी व कलानी समर्थकांसोबत चर्चां केली.
कल्याण लोकसभा मतदारसंघात साडे तीन लाखा पेक्षा जास्त मतदार सिंधी भाषिक असून या मतदारात पप्पु कलानी यांचा प्रभाव आहे. तसेच नॉनसिंधी मतदारा मध्येही कलानी यांचा प्रभाव आहे. याच हेतूने श्रीकांत शिंदे यांची आई व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धर्मपत्नी लता शिंदे यांनी कलानी महलचा उंबरठा झिजविला आहे. तसेच लता शिंदे यांनी व्यापारी मंडळाच्या पदाधिकार्या सोबत चर्चां करून श्रीकांत शिंदे माझा नव्हेतर तुमचाही मुलगा आहे. अशी भावनिक साद घातली आहे.