श्रीकांत शिंदेच्या प्रचारासाठी कलानी व आयलानी एकत्र
By सदानंद नाईक | Updated: May 9, 2024 19:32 IST2024-05-09T19:31:35+5:302024-05-09T19:32:06+5:30
कलानी कुटुंबाकडून ओमी कलानी यांनी यापूर्वीच विधानसभा निवडणुकीत उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले.

श्रीकांत शिंदेच्या प्रचारासाठी कलानी व आयलानी एकत्र
उल्हासनगर : राजकारणात कट्टर वैरी असलेले आमदार कुमार आयलानी व माजी आमदार पप्पु कलानी हे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या निवडणूक प्रचारासाठी एकत्र आल्याचे चित्र शहरात बघायला मिळाले आहे. शिंदे यांचा एकत्र प्रचार करणारे आयलानी व कलानी विधानसभा निवडणुकीत एकत्र येणार का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला.
कलानी कुटुंबाकडून ओमी कलानी यांनी यापूर्वीच विधानसभा निवडणुकीत उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले. याचाच अर्थ लोकसभा निवडणूक प्रचार संपताच आयलानी व कलानी हे जुन्या रुपात कट्टर प्रतिस्पर्धेत शहरवासीयांना बघायला मिळणार आहे. त्यावेळी श्रीकांत शिंदे कोणाला पाठिंबा देणार? याबाबतही चर्चेला उधाण आले आहे.