भिवंडीत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

By नितीन पंडित | Published: May 22, 2024 12:46 PM2024-05-22T12:46:48+5:302024-05-22T12:48:39+5:30

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

case has been registered against kapil patil minister of state for panchayati raj in bhiwandi | भिवंडीत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

भिवंडीत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी:भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार तथा केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यावर भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मतदान दिवशी मतदान केंद्रावर पोलिस अधिकाऱ्यास शिवीगाळ करणे भाजपा उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना भोवले आहे. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शांतीनगर पोलीस ठाण्यात कपिल पाटील यांच्यासह भाजपाचे शहराध्यक्ष हर्षल पाटील,उपाध्यक्ष रवी सावंत व विश्व हिंदू परिषदेचे दादा गोसावी यांच्या विरोधात मतदान केंद्रा बाहेर सहाय्य्क पोलीस निरीक्षक सुरेश घुगे यांना पाटील यांनी शिवीगाळ केली होती.हा व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.अखेर शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्य्क पोलीस निरीक्षक सुरेश घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून १८६,५०४,५०६ या कलमान्वये शांतीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल.

Web Title: case has been registered against kapil patil minister of state for panchayati raj in bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.