भिवंडीत भाजपाचे जोडे मारो आंदोलन, राहुल गांधींचा निषेध
By नितीन पंडित | Updated: March 25, 2023 16:52 IST2023-03-25T16:52:17+5:302023-03-25T16:52:36+5:30
गांधी यांनी मोदी या आडनावावरून अपमानास्पद टिप्पण्णी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला आहे

भिवंडीत भाजपाचे जोडे मारो आंदोलन, राहुल गांधींचा निषेध
नितीन पंडित
भिवंडी - राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत देशभर भारतीय जनता पार्टी कडून आंदोलन करून निदर्शने केली जात आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यनंतर राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी होत असतांनाच सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते, असे वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केले होते.
गांधी यांनी मोदी या आडनावावरून अपमानास्पद टिप्पण्णी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला आहे. या घटनेचा निषेध म्हणून भाजपा भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी धामणकर नाका येथे राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करीत निदर्शने केली. या आंदोलनात भाजपा पदाधिकारी सुमित पाटील, अँड हर्षल पाटील, यशवंत टावरे, राजू गाजंगी, ममता परमाणी, रेखा पाटील,निष्काम भैरी, जितेंद्र डाकी, प्रेषित जयवंत यांसह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.