You Will Be Shocked To Know When Cab driver tried to molest actress Upasana Singh | भयानक ! रात्री शूटिंग संपवून घरी परतत असताना ड्रायव्हरने 'या' अभिनेत्रीला निर्जन स्थळी नेलं अन्....

भयानक ! रात्री शूटिंग संपवून घरी परतत असताना ड्रायव्हरने 'या' अभिनेत्रीला निर्जन स्थळी नेलं अन्....

‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या शोमुळे घराघरात पोहचलेली ‘बुआ’ म्हणजे अभिनेत्री उपासना सिंग  आज वाढिदवस आज 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. जेव्हा जेव्हा उपासनाचे नाव येते तेव्हा त्या रात्री घडलेल्या भयानक घटनेची आठवण आजही अंगावर काटा उभा राहतो. मालिकांचे शूटिंग म्हटले की येण्या जाण्याची काहीच वेळ नसते. त्यामुळे रात्री अपरात्री कलाकारांना प्रवास करावा लागतो. उपासना एकदा रात्री उशीरा शूटिंग संपवून हॉटेलवर परतत होती. पण अर्ध्या रस्त्यात तिच्या ड्रायव्हरनं ती एकटी असल्याचा फायदा घेत हॉटेलवर जायचं सोडून गाडी दुसऱ्याच रस्त्याला घेतली. जेव्हा उपसनाला जाणावलं की आता काहीतरी वाईट घडणार आहे तेव्हा तिने लगेच पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. ज्यानंतर पोलिसांनी त्या ड्रायव्हरला अटक केली होती. पंजाबमध्ये शूटिंगसाठी उपासना गेली होती. तिथे तिच्या बरोबर ही घटना घडली होती. आजही ती रात्र आठवली की, थरकाप उडतो असे उपासना सांगते.

गेल्या काही दिवसांपासून उपासनाचे दर्शन रसिकांना घडले नाही. विविध कारणामुळे तिच्यावरही चर्चा होत असते. मध्यंतरी तिच्या वैवाहिक आयुष्यातही ती खुश नसल्याचे समोर आले होते. उपासना 2009मध्ये अभिनेता नीरज भारद्वाजसोबत विवाह केला होता. पण दोघांमध्ये हवे तसे नाते निर्माण झाले नाही. शेवटी  या दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या काही वर्षांपासून हे दोघे वेगळे राहत आहेत. 

 दोघांनीही आपले लग्न टिकून राहावे यासाठी प्रयत्न केला, पण दोघांमध्ये असलेले मतभेद मात्र संपू शकले नाही. एकमेकांकडून वेगवेगळ्या अपेक्षा असणं आणि त्या पूर्ण न करु शकणे हे त्यांचे वेगळे होण्याचे कारण असल्याचे समोर आले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: You Will Be Shocked To Know When Cab driver tried to molest actress Upasana Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.