ठळक मुद्देपलक रिअल लाईफमध्ये प्रचंड ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे़ इन्स्टाग्रामवर तिचे अडीच लाखावर फॉलोअर्स आहेत.

बातमी, मुद्दा, विषय काहीही असो त्यावर मीम्स बनणार नसतील तर नवल. सध्या सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होणे अगदी  सामान्य बाब झालीय़. विशेषत: मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींवर अनेक मीम्स बनवले जातात. सेलिब्रिटींचे फोटो एडिट करून त्यावर कधी मजेशीर तर अनेकदा खिल्ली उडवणा-या ओळी लिहून तयार करण्यात आलेले हे मीम्स क्षणात व्हायरल होतात. या मीम्सनी अनेकांचे मनोरंजन होते. पण अनेकांना मनस्तापही सहन करावा लागतो. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिंधवानी हिला अशाच मनस्तापाला सामोरे जावे लागतेय. तिची खिल्ली उडवणारे मीम्स पाहून ती जाम संतापली आहे. इतकी की, हा सगळा प्रकार थांबवा नाहीतर कायदेशीर कारवाईला तयार राहा, असा इशाराच तिने दिला आहे.


पलकने मीम्स शेअर करणा-या एका पेजवर संताप व्यक्त केला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहून तिने हा संताप बोलून दाखवला.

काय म्हणाली सोनू उर्फ पलक?

फालतू मीम आणि फालतू उत्तेजक पेजेस,
मी पहिल्यांदा आणि शेवटचे सांगतेय. माझ्या फोटोंचा वापर करू नका, माझे फोटो फोटोशॉप्ड करू नका आणि माझ्याबद्दल वाट्टेल ते लिहू नका. जगात इतके काही घडत असताना ही नकारात्मकता पसरवणे बंद करा. मी आवडत नसेल तर मला फॉलो करणे बंद करा, हे अगदी सोपे आहे. कारण माझा अपमान करण्याचा आणि माझ्याबद्दल वाट्टेल ते शेअर करण्याचा अधिकार तुम्हाला नाही.  माझ्या नावाने काही मिम्स व्हायरल होत आहेत. मालिकेत मी उच्चारलेले डायलॉग्स या मिम्समध्ये वापरले जातात. विनोदाच्या नावाखाली हा प्रकार लज्जास्पद आहे.यापुढेही तुम्ही माझ्याबद्दलचा हा प्रकार थांबवला नाही तर मी कायदेशीर कारवाई करू शकते. जे तुम्हाला महाग पडेल, असे या पोस्टमध्ये सोनूने लिहिले आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील नट्टू काकांची ही अंतिम इच्छा ऐकून व्हाल भावूक ...!

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah :'जेठालाल' ठरला सर्वाधिक महागडा अभिनेता

रिअल लाईफमध्ये प्रचंड ग्लॅमरस आहे पलक

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने पलकला एक वेगळी ओळख दिली. 2018 मध्ये पलकने कॉलेजमध्ये मॉडेलिंग स्पर्धा जिंकली होती. यानंतर तिला ‘द बार’ नामक शॉर्ट फिल्ममध्ये संधी मिळाली. ‘होस्टेज’ या वेबसीरिजमध्येही ती झळकली. पलक रिअल लाईफमध्ये प्रचंड ग्लॅमरस आहे. सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे अडीच लाखावर फॉलोअर्स आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah's Palak Sindhwani BLASTS ‘Meme Pages’, Warns Them To Stop Using Her Pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.