ठळक मुद्देप्रिया आणि तिचे पती मालव सध्या मुलाला घेऊन मालदिवला फिरायला गेले असून तिने त्यांच्या व्हेकेशनचे अनेक फोटो मालव यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांची चांगलीच आवडती आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. कोणत्याही कॉमेडी मालिकेने प्रेक्षकांचे इतके वर्षं मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील जेठा, दया, माधवी भिडे, आत्माराम भिडे, रोशनसिंग सोठी, अय्यर, बबिता, कोमल, पोपटलाल या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. या मालिकेत रिटा रिपोर्टरच्या भूमिकेत आपल्याला प्रिया आहुजाला पाहायला मिळत आहे.


 
गेल्या कित्येक महिन्यांपासून आपल्याला रिटा रिपोर्टर ही भूमिका तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत पाहायला मिळत नाहीये. प्रिया सध्या तिच्या संसारात रमली असल्याने ती मालिकेपासून दूर आहे. प्रियाचे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे दिग्दर्शक मालव राजादा यांच्यासोबत लग्न झाले आहे. याच मालिकेच्या सेटवर त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. 2008 मध्ये प्रियाने मालिकेत एंट्री केली होती आणि २०११ मध्ये दोघांचे लग्न झाले. लग्नाच्या तब्बल 8 वर्षानंतर प्रियाने मुलाला जन्म दिला. प्रिया पूर्णवेळ तिच्या बाळाला सांभाळण्यात बिझी असल्यामुळे मालिकेतून तिने एक्झिट घेतली होती. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत रिटा प्रेक्षकांना खूपच कमी भागांत पाहायला मिळत असली तरी प्रेक्षकांची ती प्रचंड लाडकी होती.

प्रिया मालिकेत काम करत नसली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. प्रिया आणि तिचे पती मालव सध्या मुलाला घेऊन मालदिवला फिरायला गेले असून तिने त्यांच्या व्हेकेशनचे अनेक फोटो मालव यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे तिचे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. 

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला अनेक वर्ष झाली असली तरी या मालिकेची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये. ही मालिका प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करत आहे. टिआरपीच्या रेसमध्ये तर ही मालिका नेहमीच अव्वल राहिली आहे.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ​Taarak Mehta Ka Ooltah Chashmah director Malav Raida and wife priya ahuja on vacation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.