'Sukhi Manasacha Sadra' will bring smiles on people's faces, Raj Thackeray tweeted 'this' for Bharat Jadhav | "सुखी माणसाचा सदरा' आणेल लोकांच्या चेहऱ्यावर हास्य', राज ठाकरेंनी भरत जाधवसाठी केलं 'हे' ट्विट

"सुखी माणसाचा सदरा' आणेल लोकांच्या चेहऱ्यावर हास्य', राज ठाकरेंनी भरत जाधवसाठी केलं 'हे' ट्विट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्य आणि कला प्रेम सर्वश्रूत आहे. अनेकदा मराठीसिनेमा आणि नाटकांबद्दल ते मनमोकळे पणाने बोलत असतात. थिएटरमध्ये मराठी सिनेमांना प्राइम टाइम मिळत नव्हता तेव्हा मनसेनं आवाज उचलला होता. मराठी असो वा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री अनेक कलाकारांशी राज ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता सुबोध भावे 'आणि  त्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाचे त्यांनी कौतुक केले होते. त्यानंतर आज पुन्हा केदार शिंदेच्या नव्या मालिकेचे राज ठाकरे यांनी भरभरून कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरे यांनी दिग्दर्शक केदार शिंदे यांची नवी मालिका 'सुखी माणसाचा सदरा' याचा प्रोमो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, ही मालिका लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.


मालिकेबद्दल बोलताना आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, 'कोरोनाचे सावट आणि त्यामुळे आलेलं आर्थिक संकट यामुळे सगळ्यांचाच आनंदच कुठेतरी हरवला आहे. केदार शिंदेच्या 'सुखी माणसाचा सदरा' या लॉकडाऊननंतरच्या पहिल्या नव्या दुरदर्शन मालिकेमधून ते सुख, तो आनंद सापडू दे, असे मनापासून वाटते आहे.' 


तसेच सुखी माणसाचा सदरा मालिकेतून अभिनेता भरत जाधवने छोट्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. याबद्दल राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'भरत जाधवला बऱ्याच वर्षांनी छोट्या पडद्यावर आलेले पाहून छान वाटले. या सगळ्या अस्वस्थ, अनिश्चिततेच्या वातावरणात तुमचा 'सुखी माणसाचा सदरा' रोज किमान अर्धा तासतरी मराठी मनांना या अनिश्चितेतून ब्रेक देईल आणि लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल आणि त्या आनंदात येणाऱ्या दिवसाला सामोरे जाण्याची ताकद मिळेल हे केदार, भरत तुम्ही नक्की पाहा.'

अशा पद्धतीने राज ठाकरे यांनी केदार शिंदे आणि भरत जाधव यांच्यासह या मालिकेच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 'Sukhi Manasacha Sadra' will bring smiles on people's faces, Raj Thackeray tweeted 'this' for Bharat Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.