Is shweta tiwari corona positive actress had got tested after being unwell | श्वेता तिवारीला झाला कोरोना ? तब्येत बिघडल्यानंतर केली कोव्हिड -19ची टेस्ट

श्वेता तिवारीला झाला कोरोना ? तब्येत बिघडल्यानंतर केली कोव्हिड -19ची टेस्ट

टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी कोरोना पॉझिटीव्ह आल्याची चर्चा आहे. 'शादी मुबारक' फेम अभिनेत्री राजेश्वरी सचदेव कोरोना पॉझिटीव्ह आली आहे, त्यानंतर 'मेरे डॅडी की दुल्हन'मध्ये काम करणारा राजेश्वरीचा पती अभिनेता वरुण बडोलाने देखील त्याची कोरोना टेस्ट केली आहे.  

वरुण बडोलाची को-स्टार श्वेता तिवारीसुद्धा कोरोना पॉझिटीव्ह येऊ शकते. वरुण आणि श्वेता 'मेरे डॅड की दुल्हन'मध्ये एकत्र काम करतात.  नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, श्वेताची तब्येत ठीक नव्हती, ज्यानंतर तिने  कोरोना टेस्ट केली आहे. श्वेताची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत श्वेताने ऑफिशिय स्टेटमेंट दिलेले नाही. तसेच प्रॉडक्शन हाऊसकडून काहीच स्टेटमेंट देण्यात आलेले नाही त्यामुळे अजून याबाबत काही स्पष्ट झालेले नाही. 'मेरे डॅड की दुलहन'चे शूटिंग अजून सुरु आहे. मेरे डॅड की दुलहनमध्ये श्वेता गुनीतची भूमिका साकारते आहे. 


आतापर्यंत अनेक टीव्ही कलाकार कोरोना झाला आहे. यात राजेश्नरी सचदेव,  दिशा परमार, 'भाबीजी घर पर है' मालिकेचा   निर्माता संजय कोहला, अभिनेता संजय कौशिक, करम राजपाल, हिमांशु सोनी, राजेश कुमार, हिमांश कोहली, जरीना वहाब, मलायका अरोरा आणि हिमानी शिवपुरीचे नाव या लिस्टमध्ये सामील आहे. 

दोन मुलांची आई असूनही अभिनेत्री श्वेता तिवारी दिसते खूप ग्लॅमरस, पहा फोटो

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Is shweta tiwari corona positive actress had got tested after being unwell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.